Suspicious Death: पाॅन्डिचेरीतील पर्यटकाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू

ड्रग्स अतिसेवन : शवविच्छेदनानंतर उलगडा शक्य
Suspicious Death
Suspicious DeathDainik Gomantak

म्हापसा: गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या 21 वर्षीय पाॅन्डिचेरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतिसेवनाने झाल्याचा शेरा गोमेकॉतील डॉक्टरांनी मारल्याने खळबळ उडाली असून, शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. रिशवंत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

(Death of a tourist in Pondicherry under suspicious circumstances)

Suspicious Death
Goa Petrol-Diesel Price: जाणून घ्या आजचे गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाॅन्डिचेरी येथून पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गट हा 13 ऑगस्टला गोव्यात पर्यटनासाठी दाखल झाला होता. ते वागातोर येथील हॉटेलमध्ये उतरले होते. दोन दिवस गोव्यातील काही महत्त्वाची ठिकाणे फिरल्यानंतर सोमवारी रात्री या गटातील चौघेजण साळगाव येथे वेस्टंड नाईट क्लबमध्ये गेले होते. पहाटे तेथे डान्स करताना रिशवंतला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते क्लबमधून बाहेर पडले आणि मंगळवारी सकाळी म्हापशाला आले. पुन्हा साळगावला दुचाकीवरून जाताना गिरी येथे त्याला जास्तच अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे हॉटेलवरील मित्राला त्यांनी कार घेऊन येण्यास सांगितले. कारमधून त्यांनी त्याला वागातोरला आणले. तेथील एका खासगी इस्पितळात त्याला नेले. मात्र, त्याची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर या पर्यटकांनी हॉटेलमालकाला मदतीसाठी बोलावले.

Suspicious Death
Ambulance Issue: हाकेच्या अंतरावर यायला ‘108’ ला तब्‍बल पाऊण तास!

एकच निदान

वागातोरमधील खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हा ड्रग्स अतिसेवनाचा प्रकार असून, एमडीएमए व एलएसडीचे सेवन केल्याचे नमूद केले होते. गोमेकॉतील डॉक्टरांनीही त्याचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झाल्याचे नमूद केले आहे.

ड्रग्स सेवनाचा इन्कार

मृताच्या मित्रांनी मात्र, ड्रग्स सेवनाचा इन्कार केला आहे. आम्ही ड्रग्सचे सेवन केलेच नाही. शिवाय आम्ही डॉक्टरांसमोर ड्रग्सचा उच्चारही केला नाही. पण आमच्या मित्राचे मृत्यू प्रकरण हे ड्रग्सशी जोडल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मृत विद्यार्थ्याचे कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन होईल. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com