राज्यात अपघाती मृत्यूंनी गाठली ‘शंभरी’

अतिवेग, खराब रस्ते कारण : पाच महिन्यांतील दुर्घटनांचे विश्लेषण : 4.45 कोटींचा दंड वसूल
Accident in Goa
Accident in GoaDainik Gomantak

मडगाव : चिंबल येथे ट्रकची धडक बसून वृद्ध पादचारी ठार झाल्याचे वृत्त ताजे असून या आठवड्यात अवघ्या चार दिवसात झालेल्या तीन भीषण अपघातांत पाच जणांचे बळी गेल्याने राज्यातील ही गंभीर समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात राज्यातील एकूण अपघातांनी 1200 ची संख्या पार केली असून त्यात बळी गेलेल्यांच्या संख्येने शंभरी गाठली आहे.

Accident in Goa
अटल सेतूवर वाहनांच्या वेगावर ‘नजर’

चिंबल आणि पारोडा येथे झालेल्या अपघातांचे मुख्य कारण अव्यवस्थित रस्ते असून शिवोली येथे पहाटेच्यावेळी झालेल्या अपघाताचे कारण म्हणजे चालक झोपेच्या अधीन गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर वेगाने धडकली हे आहे.

गोवा वाहतूक पोलिस विभागाकडून जानेवारी ते एप्रिल या कालावधीची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यात यंदाच्या पहिल्या चार महिन्यात गोव्यात एकूण 1027 अपघात झाले असून त्यातील प्राणघातक अपघातांची संख्या 75 असून या अपघातात एकूण 80 जणांचे बळी गेले आहेत. त्यानंतर मे त्यात आणखी 20 अपघाती बळींची भर पडली आहे.

Accident in Goa
कुचेलीत अपघातग्रस्त कारची चारही चाके लंपास; 24 तासांत दुसरी घटना

यात दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असून पहिल्या चार महिन्यात 49 दुचाकी चालविणारे तर मागे बसलेल्या 12 सहप्रवाशांचा अपघातात बळी गेला. अन्य मृतांमध्ये 14 पादचारी, दोन प्रवासी, एक वाहन चालक तर अन्य दोघांचा इतर प्रकारे मृत्यू झाला आहे.

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची 2.45 लाख प्रकरणे नोंद झाली असून अशा नियम मोडणाऱ्याकडून 4.45 कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. मार्च महिन्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून सुमारे 1447 चलने देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com