गोव्यातील धक्कादायक प्रकार! 67 जणांच्या मृत्यूची माहिती 9 महिन्यांनंतर झाली उघड

Death body 1.jpg
Death body 1.jpg

पणजी: राज्यातील काही खासगी हॉस्पिटल कोविड बळींची माहिती लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या व  मृत्यू झालेल्या ६७ व्यक्तींची माहिती आता ९ महिन्यांनंतर उघड झाली आहे. (Deaths of 67 people were revealed 9 months later in Goa)

माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 या काळात हे मृत्यू झाल्याचे कळते. सबंधित खासगी इस्पितळांवर माहिती लपवल्याबद्दल कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी 13 बळी गेले.  त्यातील 10 मृत्यू हे गोमॅकॉत, तर 3  मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, मडगाव येथे झाले. 

24 तासात श्‍वेतपत्रिका काढा
आम आदमी पक्षाने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. 24 तासात श्‍वेतपत्रिका काढा असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोविड (Covid-19) उपचारासाठीच्या औषधांच्या यादीतून आयव्हर्मेक्टिन (Ivermectin) गोळ्या हटवल्यामुळे वाटपासाठी खरेदी केलेल्या 22 कोटी 50 लाख रुपयांच्या गोळ्यांचे करायचे काय, हा मोठा प्रश्‍न आता राज्य सरकारसमोर उभा ठाकला आहे. अविचारी पद्धतीने या गोळ्यांची खरेदी केल्याचा आरोप याआधीच काँग्रेसने (Congress) केलेला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारने अकारण 22 कोटींचा चुराडा केल्यातच जमा झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com