Sadetod Nayak: राजकारण्यांकडून देव, धर्माचा स्वार्थासाठी वापर

वैज्ञानिक विचारांची गरज : ‘सडेतोड नायक’ चर्चेत मान्यवरांकडून ठपका
Sadetod Nayak: राजकारण्यांकडून देव, धर्माचा स्वार्थासाठी वापर

मडगाव: काँग्रेसच्या आठ आमदारांचा एक गट 14 सप्टेंबरला भाजपात विलीन झाला. या गटाचे म्होरके तथा माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी 'आपण देवाचा प्रसाद घेऊनच हे पाऊल उचलले आहे' अशा शब्दात आपल्या पक्षांतराचे जे समर्थन केले आहे, ते विधान सध्या देशभर तसेच गोव्यातही चर्चेचा विषय ठरले आहे. हाच मुद्दा पकडून ‘सडेतोड नायक’मध्ये तज्ज्ञांनी आक्रमकपणे मते मांडली.

राजकारणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी देवा-धर्माचा वापर करतात व दिवसागणिक हे प्रकार वाढत चालले आहेत. त्यासाठी समाजात वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करण्याची आणि तशी चळवळ उभी राहण्याची गरज आहे असा सूर दिसून आला. या चर्चेत डॉ. मुकुल रायतुरकर, कामगार नेते प्रसन्न उटगी, मोहनदास लोलयेकर, जुजे मारिया मिरांडा, दिलीप प्रभुदेसाई व किरण नायक सहभागी झाले होते.

राजू नायक

‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक (Raju Nayak) यांनी चर्चेची सुरुवात करताना विषयाची पार्श्वभूमी विषद केली व आपला देश तसेच राज्यघटनाही धर्मनिरपेक्षतेची ग्वाही पदोपदी देते मग राजकारणी आपल्या कृतीचे समर्थन करताना देवा धर्माला, प्रसादाला आणण्याचा जो प्रकार घडत आहे, तो योग्य म्हणता येईल का? असा मुद्दा मांडला.

Sadetod Nayak: राजकारण्यांकडून देव, धर्माचा स्वार्थासाठी वापर
Goa कुचेली येथे पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

डॉ. मुकुल रायतुरकर

या प्रकरणाच्या दोन बाजू आहेत. आपण राज्यघटना मानत असू तर त्यात अशा भावनांना स्थान नाही, कर्तव्य म्हणून पाहिले तरीही तेच आहे. हे प्रकार प्रत्येकाच्या मानसिकतेतून घडतात. त्यावर एकमेव उपाय म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत करणे होय.

मोहनदास लोलयेकर

राजकारणीच नव्हे, तर एकंदर समाजच पुरोगामी विचारसरणी ऐवजी देवाधर्माकडे जास्त प्रमाणात वळत आहे. त्यात चांगले शिक्षण घेतलेलेही आहेत. ती खरी चिंतेची बाब आहे. आपल्या मते मानसिक असंतुलन, तरुणांमधील अस्वस्थता ही त्यामागील कारणे असावीत. देवळे व मठ यांची संख्या जशी अतोनात वाढली, तशीच त्यांची श्रीमंतीही वाढली सामाजिक असुरक्षिततेमुळे देवाचे प्रस्थ वाढले.

प्रसन्न उटगी

भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेला उचलून धरलेले आहे. कोणत्याही देवाचा उल्लेख केलेला नाही, तरीपण विशिष्ट पध्दतीने त्याला पुढे आणले जात असून ते पाहिले तर आपणाला सोयीस्कर अशी नवी घटना तयार करणे, असा जो संशय व्यक्त केला जातो. त्याला बळकटी मिळते. पण कोणत्याही दृष्टीने देवाच्या नावाने पक्षांतर हे निषेधार्हच आहे.

जुजे मिरांडा

राजकारणात देवाला आणणे, गैर आहे. कारण त्यातून लोकांच्या भावनांशी खेळल्यासारखे होईल. चर्च संस्थेने कधीच थेट राजकारणात हस्तक्षेप केला नाही. मात्र पर्यावरण विषयक प्रश्नात ती सदैव आक्रमक राहिली, हे खरे आहे. चर्चने प्रार्थनेसाठी आवाहन केले, तर गर्दी होते. पण तेच एखाद्या सामाजिक प्रश्नावर हाक दिली, तर तसा प्रतिसाद मिळत नाही.

Sadetod Nayak: राजकारण्यांकडून देव, धर्माचा स्वार्थासाठी वापर
Madgaon Mayor Election : मडगाव पालिकेत विजय किंगमेकर; भाजपचे 5 नगरसेवक फितूर

दिलीप प्रभुदेसाई

राजकारणी सतत लोकांची व निवडणूक प्रक्रियेची थट्टा करत आलेले आहेत. एक प्रकारे निवडणूक आयोगाचेच अपयश असून त्यासाठी ही व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. निवडणुकीपूर्वी व नंतर आता ज्या शपथांचा उल्लेख होतो आहे, त्याची गंभीर दखल जर आयोगाने घेतली असती तर हे प्रकार टळतील. कारपोरेटवालेच खरे तर हे सर्व राजकारण खेळत आहेत अशी शंका येत आहे.

किरण नायक

पक्षांतराचे हे प्रकार आजचे नाहीत, तर पूर्वीपासून ते चालू आहेत. या पूर्वी दिगंबर कामत भाजपमधून असेच काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी वेगळे कारण दिले होते, आज ते देवाच्या प्रसादाचे कारण देत आहेत. बाकीचे विकासकामाचे निमित्त सांगत आहेत. एकूण पक्षांतर हे अयोग्यच व म्हणून अशा प्रकारांविरुद्ध लोकचळवळ हाच एकमेव उपाय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com