विधानसभा अधिवेशन १५ जूनला ठरणार

Goa Assembly
Goa Assembly

पणजी

ग्रीन झोनमध्ये असलेला गोवा सध्या कोविड - १९ संकटातून मार्ग काढण्याचा व महामारी रोखण्याचा प्रयत्न करत असताना यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख येत्या १५ जूनला ठरविली जाईल. हे अधिवेशन जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.
सध्या गोवा राज्य कोविड - १९ च्या संकटातून मार्ग काढत आहे. वास्को येथील मांगोरहिल भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ती रोखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे करत आहेत. कोरोना प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सुरवातीपासून योग्यप्रकारे हाताळले आहे. मात्र, गोव्यात प्रवेशावरील बंदी उठविल्यापासून गेल्या काही दिवसांत कोविड - १९ चे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरवात झाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी तसेच आरोग्यमंत्र्यांनी दखल घेऊन त्या दिशेने ते नजर ठेवून आहेत. काल रात्री आरोग्यमंत्र्यांनी तर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मांगोरहिल परिसराला भेट देऊन तेथे तातडीने आवश्‍यक त्या
उपाययोजना करण्यासंदर्भात वास्कोत तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजप सरकार कार्यक्षम आहे, असे पाटणेकर म्हणाले.
दरम्यान, गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये आल्यावर सरकार कोविड - १९ बाबत गंभीर न राहता केंद्रीय गृहमंत्रालयाने मानक परिचालन सूचना जारी केल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता लागू केली. विरोधकांकडून त्यावर जोरदार टीकाही झाली. मात्र, गोव्यामध्ये प्रवेश देण्यास सुरवात झाल्यापासून बाहेरून आलेल्या व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह सापडण्यास सुरवात झाली. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना वास्को येथील मांगोलहिल परिसरात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी भर घातली आहे. कोविड - १९ वर भर देण्याचे सोडून सरकार राज्यातील विकासकामे याकडे अधिक लक्ष देत असल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवरून विरोधकांकडून अनेक प्रश्‍न विचारले जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com