Goa:"दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुर्दैवी"

EXAM.jpgv
EXAM.jpgv

पणजी: राज्यात सध्याची कोरोना संसर्गाची (Covid19) स्थिती तसेच आगामी कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या गोवा (Goa) शालान्त मंडळाची दहावीची परीक्षा (10th Board Exam) रद्द करण्याचा निर्णय घेतला असून  बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या बुधवारपर्यंत (26 मे) निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केली. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित मूल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Decision to cancel the 10th exam is unfortunate)

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणाशीही सल्लामसलत न करता घेण्यात आलेला आहे. मुलांनी शिक्षणाकडे गंभीरपणे पाहण्याच्या बाबतीत हा निर्णय खूप हानिकारक आहे. तसेच शिक्षकांच्या दृष्टीने मानसिक खच्चीकरण करणारा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी परीक्षेची गंभीरपणे तयारी करत असताना अकस्मात आता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची गरज नव्हती, असे मत मडगाव येथील रवींद्र केळकर ज्ञानमंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नी‌ यांनी व्यक्त केले.

निर्णय सकारात्मक घ्यावा!
''कोविड महामारीचे संकट लक्षात घेता सद्यस्थितीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता हा निर्णय सकारात्मक दृष्टीने घ्यावा. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना संबंधित शाळांनी गुणांचे मूल्यांकन करून केवळ गुण न देता श्रेणी द्यावी. तसेच अकरावी किंवा अन्य पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देतेवेळी संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घ्यावी. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणाचाही पालकांनी विचार करावा, असे मत राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक गजानन शेट्ये यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com