गोवा पालिका निवडणूकीचा ‘चेंडू’ निवडणूक आयोगाच्या कोर्टात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

राज्यात पालिका निवडणूक जाहीर झाली आहे मात्र या पालिका प्रभाग आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कालपासू सुरू आहे.

पणजी: राज्यात पालिका निवडणूक जाहीर झाली आहे मात्र या पालिका प्रभाग आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कालपासू सुरू आहे. ही सुनावणी आज पूर्ण न झाल्याने ती उद्या पुन्हा पुढे सुरू राहणार आहे.

पालिका प्रभागमध्ये महिलांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण घटनेत तरतूद केल्यानुसार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने आज सुनावणीवेळी मान्य केले आहे. त्यामुळे या आरक्षणातील त्रुटी सरकारला दुरुस्त करण्यास लावणार की सरकारने या दुरुस्त्या न केल्यास निवडणूक घेतली जाणार यासंदर्भात उच्च न्यायालयाने आयोगाला उद्यापर्यंत स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे गोवा खंडपीठाने या निवडणुकीचा ‘चेंडू’ आयोगाच्या कोर्टात टाकला आहे.

आणखी वाचा:

कर्नाटकने म्हादईच्या पळवलेल्या पाण्याची सर्वोच्च न्यायालय पाहणी करणार 

पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर सिलिंडरचा स्फोट; लाखोंचं नुकसान 

संबंधित बातम्या