15 सदस्यांच्या समितीपुढे होणार आयआयटीवर निर्णय: मुख्यमंत्री सावंत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आयआयटी प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करणार्‍या शेळ मेळावलीवासीयांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिला.

 

 

 सत्तरी :  आयआयटी प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करणार्‍या शेळ मेळावलीवासीयांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिला.

तेथिल एका मंदिरात स्थानिकांसोबत बैठक घेउन मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार जनभावनेचा आदर करतं; परंतु अख्ख्या गावासमोर चर्चा होउ शकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी 15 लोकांची समिती नेमावी आणि सरकारला चर्चेसाठी निमंत्रित करावं. लोकांच्या मतानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही स्थितीत लोकांच्या मताचा अनादर केला जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं.

दरम्यान, तेथिल समस्त ग्रामस्थांनी आयआयटीला अखेरपर्यंत विरोधच राहील, असं मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं.

संबंधित बातम्या