Goa Curfew: कर्फ्यु वाढणार की संपणार? 6 जुनला होणार फैसला

sawant pramod.jpg
sawant pramod.jpg

राज्यात सुरू असलेला कर्फ्यू येत्या 7 मे रोजी संपणार असुन राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊनच, कर्फ्यू वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय गोवा सरकार (Goa Government) घेईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी शुक्रवारी सांगितले. त्यासाठी कर्फ्यूची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 6 जून रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 6 जून रोजी होणाऱ्या बैठकीतूनच आम्ही पुढची भूमिका ठरवू असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले आहे. (Decision to increase curfew in Goa will be taken on June 6)

कर्फ्यूच्या परिणामावर आपण समाधानी आहात काय असे विचारले असता “आम्ही समाधानी आहे की नाही हे सांगण्यापेक्षा मृत्युदरात किती घट झाली, कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण किती कमी झाले, लोक नियमांचे पालन किती प्रमाणात करता आहेत हे पाहणे अधिक महत्वाचे आहे.” 

ज्यावेळी राज्यात दररोज कोरोना संक्रमणाची दररोज तीन हजार नवीन प्रकरण समोर येत होती तसेच, मृत्यूचा आकडा दररोज 100 च्या जवळपास जात होता, याच पार्शवभूमीवर राज्य प्रशासनाने 9 मे रोजी संचारबंदी लागू करण्याचा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. आता 7  जून रोजी या कर्फ्यूचा कालावधी  संपणार आहे.

कर्फ्यू उघडण्यात आला तर, त्यानंतर लोकांनी गर्दी न करणे, मास्क वापरणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण तिसरी लाट जर आली तर पुन्हा लॉकडाऊन सारखे निर्णय घ्यावे लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com