‘सनबर्न’चा विषय आमच्या खात्यांतर्गत नाही : विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सनबर्नला परवानगी देण्याचा विषय आमच्या अखत्यारित येत नाही. जर आमच्या अखत्यारित तो विषय असता तर आम्ही त्यास परवानगी दिली नसती. राज्यात जे काही कार्यक्रम होत आहेत, त्यासाठी कडक मानक कार्यप्रणालीची (एसओपी) गरज आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाईसुद्धा अपेक्षित आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केले. 

पणजी :  सनबर्नला परवानगी देण्याचा विषय आमच्या अखत्यारित येत नाही. जर आमच्या अखत्यारित तो विषय असता तर आम्ही त्यास परवानगी दिली नसती. राज्यात जे काही कार्यक्रम होत आहेत, त्यासाठी कडक मानक कार्यप्रणालीची (एसओपी) गरज आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाईसुद्धा अपेक्षित आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केले. 

कोविडविषयी राज्यातील डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. याप्रसंगी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवानंद बांदेकर, डॉ. उदय काकोडकर, डॉ. उत्कर्ष यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

राणे म्हणाले की, सनबर्नचा विषय आमच्या खात्याअंतर्गत येत नाही. परंतु राज्यात जे काही कार्यक्रम होत आहेत, त्यांच्यासाठी कडक मानक कार्यप्रणाली हवी आहे. परदेशात ज्याप्रमाणे मास्क न वापणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सनबर्नसारख्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

 ते पुढे म्हणाले की, जे कोणी कार्यक्रम आयोजित करतात, त्यांच्यासाठी कडक एसओपीची गरज आहे. गर्दी होत असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटना दूरचित्रवाहिनीवरून दिसत आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या हातात अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचा हक्क आहे. त्यांनी अशा कार्यक्रमांसाठी कडक कार्यप्रणाली आणावी,  असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या