वाहतूक पोलिसांच्या महसूलात ३० लाखांची घट

गोमंतक वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

राज्यात यावर्षी रस्ता अपघात संख्येत घट 
होण्याबरोबरच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या महसुलात ३० लाख रुपयांची घट झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत गेल्यावर्षी ७.४२ कोटी रुपये
महसूल जमा झाला होता, तर यावर्षी त्याच काळात ७.१२ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. कोविडच्या काळात राज्याच्या सीमा बंद राहिल्याने त्याचा फटका या महसूलाला बसला आहे. 

पणजी :  राज्यात यावर्षी रस्ता अपघात संख्येत घट 
होण्याबरोबरच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या महसुलात ३० लाख रुपयांची घट झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत गेल्यावर्षी ७.४२ कोटी रुपये
महसूल जमा झाला होता, तर यावर्षी त्याच काळात ७.१२ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. कोविडच्या काळात राज्याच्या सीमा बंद राहिल्याने त्याचा फटका या महसूलाला बसला आहे. 

जानेवारी ते सप्टेंबर या काळात यावर्षी मोटार वाहन कायद्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ लाख १४ हजार ३७९वाहनांच्या चालकांना दंड
ठोठावून ७ कोटी ११ लाख ४५ हजार रुपये गोळा केल आहेत. गेल्या वर्षी याच काळात ६ लाख २१ हजार ६१८ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून ७ कोटी ४२ लाख १३ हजार ८०० रुपये जमा केले होते.

राज्याच्या सीमा खुल्या केल्याने पर्यटक वाहनाने गोव्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन  करणाऱ्याच्या प्रकरणात सप्टेंबर महिन्यापासून वाढ होऊ लागली आह. सप्टेंबर २०२० मध्ये ६४ हजार ४४८ वाहन चालकांना दंड ठोठावून ७५ लाख ५ हजार ५० रुपये सप्टेंबर २०१९ मध्ये ४८ हजार २९७ वाहन चालकांवर  कारवाई करून ५८ लाख ७४ हजार ७००रुपये जमा झाले. १६ हजार १५१ प्रकरणे अधिक वाढली आहेत व १६ लाख ३० हजार ३५० अधिक रक्कम जमा झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसांत विशष मोहीम राबविण्यात येणार आहे.

किनारपट्टी परिसरात कारवाई वाढवली
गेल्या महिन्यापासून राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. बंद असलेला टॅक्सी व्यवसाय आता हळूहळू सुरू होण्यास लागला आहे. त्यामुळेकिनारपट्टी भागात पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. दंडात्मक
कारवाईतून जमा होणारा महसूल कमी झाल्याने वाहतूक पोलिसांना मोटार वाहन कायद्याचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून ही घट डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिस जागोजागी दंडात्मक कारवाईसाठी तत्पर असतात. 

संबंधित बातम्या