Goa: दीनदयाळ योजनेखालील गाडे अजून बंद अवस्थेत

हे गाडे बेकार युवकांना गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळतर्फे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी देण्यात आले होते.
Shop
ShopDainik Gomantak

Goa: दीनदयाळ योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेल्या आके येथील अग्नीशमन दलाच्या जवळ असलेल्या गाड्यांची दुरवस्था झाली असून मागील कित्येक वर्षांपासून हे गाडे बंद अवस्थेत आहेत. याबरोबरच ते मोडकळीस आले आहेत.

या गाड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जवळच 12 गाड्यांचा समावेश असलेली नवीन शेड बांधण्यात आली आहे. मात्र, ते अजूनपर्यंत खुले करण्यात आले नाहीत.

सहा ते सात वर्षांपूर्वी हे गाडे बेकार युवकांना गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळतर्फे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी देण्यात आले होते.

या ठिकाणी एकंदरीत 5 गाडे स्थापन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळी सर्व गाडे खुले करण्यात आले होते. त्यानंतर याठिकाणी लोकांची ये-जा होत नसल्याने आणि गाडेमालकांना गिऱ्हाईक मिळत नसल्याने काहीजणांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Shop
Kala Academy: 'झुरळ' हे नाटक म्हणजे अतिनाट्यात चिरडलेला प्रयोग

कोकण रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी पार्किंग व्यवस्थेचे काम सुरू होते ते पूर्ण होऊन त्याला दीड ते दोन वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, त्यांचे स्थलांतरण या ठिकाणी करण्यात आले नाही. गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळतर्फे देण्यात आलेल्या गाड्यांऐवजी या ठिकाणी या गाडेधारकांच्या पुनर्वसनासाठी 12 गाड्यांचा समावेश असलेली नवीन शेड बांधली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com