दीपक नाईक यांची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नाईक यांची मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची अपेक्षा होती. परंतु ते या पदापासून दूर राहिले असा खुलासा सूत्रांनी केला आहे.
Krushna Salkar
Krushna SalkarDainik Gomantak

वास्को: वास्को भाजपचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तसेच मुरगाव नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दीपक नाईक यांची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(Deepak Naik appointed as Chairman of Goa State Infrastructure Development Corporation)

Krushna Salkar
Goa Panchayat Elections पंचायत निवडणुका केवळ फार्स

नाईक यांची मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची अपेक्षा होती. परंतु ते या पदापासून दूर राहिले असा खुलासा सूत्रांनी केला आहे. त्यांनी यापूर्वी कदम ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास अधिक आनंद होत असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वास्को भाजपचे उमेदवार कृष्णा साळकर यांना प्रचंड मते मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com