पर्तगाळ मठातील श्री राम मंदिरात दिपोत्सव

subhash Mahale
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राम मंदिर भुमी पुजनाच्या पार्श्र्वभूमीवर दिपोत्सव करण्यात आला.या वेळी विद्याधिराज तीर्थ स्वामी व त्याचे शिष्य स्वामी विद्याधिश त्याचप्रमाणे मठ समितीचे स्थानीक प्रतिनिधी दिनेश पै उपस्थित होते.

काणकोण पर्तगाळ येथील गोकर्ण पर्तगाळी मठातील श्री राम मंदिरात अयोध्येतील श्री राम मंदिर भुमी पुजनाच्या पार्श्र्वभूमीवर दिपोत्सव करण्यात आला.या वेळी विद्याधिराज तीर्थ स्वामी व त्याचे शिष्य स्वामी विद्याधिश त्याचप्रमाणे मठ समितीचे स्थानीक प्रतिनिधी दिनेश पै उपस्थित होते.मठात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदा करोना महामारीमुळे तो उत्सवी स्वरूपात साजरा करण्यात आला नाही त्याचप्रमाणे मठातील सर्व धार्मीक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करण्यात येतात.

 

 

 

संबंधित बातम्या