दूरसंचार सुविधा धोरण निश्‍चिती करा

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

एका कंपनीच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, स्थानिक पातळीवरील पंचांकडूनही मोबाईल मनोरे बसवणे, देखभाल दुरूस्ती करणाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडतात. एका बाजूने लोक मोबाईल सेवा हवी म्हणतात आणि दुसरीकडे मनोऱ्यांना विरोध करतात. गोवा सरकारने गोवा ब्रॉडबॅण्ड नेटवर्कचा विस्तार प्रत्येक पंचायतीपर्यंत, घरापर्यंत पाहण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, पाठपुरावा केला नाही. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घ्या, असे आम्ही सरकारला सांगितले आहे.

पणजी :

राज्य सरकारने दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण तयार करावे, अशी मागणी राज्यातील मोबाईल ऑपरेटर्सनी सरकारकडे केली आहे. ब्रिक्स परिषदेवेळी सरकारने तेथे दूरसंचार सुविधा निर्मिती करा, परिषदेनंतर स्थानिक ती वापरतील, असे या कंपन्यांना सांगितले होते. मात्र, परिषदेनंतर पंचायतींनी ते मनोरे गुंडाळायला या कंपन्यांना भाग पाडले होते.

एका कंपनीच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, स्थानिक पातळीवरील पंचांकडूनही मोबाईल मनोरे बसवणे, देखभाल दुरूस्ती करणाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडतात. एका बाजूने लोक मोबाईल सेवा हवी म्हणतात आणि दुसरीकडे मनोऱ्यांना विरोध करतात. गोवा सरकारने गोवा ब्रॉडबॅण्ड नेटवर्कचा विस्तार प्रत्येक पंचायतीपर्यंत, घरापर्यंत पाहण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, पाठपुरावा केला नाही. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घ्या, असे आम्ही सरकारला सांगितले आहे. सरकारने येत्या पंधरवड्यात त्याबाबत काय ते ठरवू, असे आम्हाला आश्वासन दिले आहे. यामुळे दूरसंचार सुविधांना संरक्षण मिळणार आहे.

राज्यातील इंटरनेट पुरवठादार
जी वेह
इथरनेट
बीएसएनएल
डीएनए
हाथवे ब्रॉडबॅण्ड
जोईस्टरइन्फोसर्व्ह
जेटवे इंटरनेट
अलेग्रा कम्युनिकेशन

बॅण्डविथ पुरवठादार
टाटा
व्होडाफोन
एअरटेल

मनोऱ्यांची संख्या
तालुके जिओ व्होडाफोन आयडिया एअरटेल
बार्देश १३२ १२२ १०७ १०७
डिचोली ३४ ३१ २१ १७
काणकोण २१ १३ १४ १२
धारबांदोडा १० ६ ४ २
मुरगाव ६९ ५८ ५४ ४९
पेडणे २६ २६ १७ १८
फोंडा ५८ ४७ ३६ ३९
केपे २३ १९ १६ ११
सासष्टी १०२ १०८ १०५ ८८
सांगे ११ ७ ७ ६
सत्तरी २७ १५ १० ८
तिसवाडी ८८ ८९ ७९ ७५

मोबाईल ग्राहक संख्या
व्होडाफोन आयडिया १० लाखाहून अधिक
जिओ ९ लाख १० हजार
एअरटेल ५ लाख

संबंधित बातम्या