थकीत वीज बिले भरल्यावर विलंब शुल्क माफ- मुख्यमंत्री

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

दोन हप्त्यात बिल फेड केल्यास १० टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. या प्रमाणे किती हप्त्यांत वीज बिल भरणार त्या तुलनेत विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. पाच प्रकारे हप्ते ठरवण्यात आले आहेत. वीज खाते वसुली करणार आहे. वीज वापरल्याचे शुल्क हे दिलेच पाहिजे.

पणजी- राज्यात थकीत वीज बिले ग्राहकांनी भरल्यास त्यांना विलंब शुव्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला जाऊन भेटण्याची गरज नाही. वीज खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेच्या लिंकवर क्लिक करून अर्ज करता येईल. तो ग्राहक येईल. शंभर टक्के वीज बिल एकरकमी भरणार आहे त्याला शंभर टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. दोन हप्त्यात बिल फेड केल्यास १० टक्के विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. या प्रमाणे किती हप्त्यांत वीज बिल भरणार त्या तुलनेत विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. पाच प्रकारे हप्ते ठरवण्यात आले आहेत. वीज खाते वसुली करणार आहे. वीज वापरल्याचे शुल्क हे दिलेच पाहिजे. आजवर ३२० कोटी रुपयांची वीज बिले थकीत आहेत. त्यावर ९१ कोटी रुपये विलंब शुल्क आहे. ग्राहकांनी ही वीज बिले भरल्यास विलंब शुल्क टक्केवारीच्या प्रमाणात माफ केले जाणार आहे. ४० वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.

त्यासंदर्भातील खटले  वीज बिले भरल्यानंतर मागे घेतले जाणार आहेत. एक महिन्यासाठी ही योजना खुली असेल. बिले न भरणाऱ्यांचे वीज जोड तोडले जातील. पणजी महापालिकेने मार्केटचे वीज बिल न भरल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

वीज खात्यात महसुल वसुली अधिकारी असे पद निर्माण करून त्यांना निम्नन्यायिक अधिकार दिले जाणार आहेत असे एका प्रश्नावर सांगून ते म्हणाले, कुटुंबातील एकाच्या नावावर वीज बिल थकल्यावर कुटुंबातीलच दुसऱ्या सदस्याच्या नावे वीज जोड घेईन वीज वापरणे सुरु ठेवल्याचेही प्रकार अनेक आहेत. त्यांनी जूनी वीज बिले भरावीत अन्यथा असलेलेही वीज जोड तोडण्यात येणार आहेत. थकीत बिलांच्या वीज ग्राहकांना शोधून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वीज खात्याचे अधिकारी घरोघरी जातील.  त्यांना आता वीज बिल भरण्याची संधी दिली जात आहे. वीज जोड तोडण्याची, कारवाईच्या अनेक नोटीसा पाठवण्यात आल्या तरी हे ग्राहक दाद देत नाहीत. त्यामुळे वीज बिल भरा अन्यथा कारवाईस समोरे जा असा त्यांना इशारा देण्यात येत आहे.
 

संबंधित बातम्या