Goa Electricity Cut: राजकारण्यांच्या वादात सर्वसामान्यांचे हाल

Goa Electricity Cut: राजकारण्यांच्या वादात सर्वसामान्यांचे हाल
Delay in connecting broken power lines in opposition constituencies

पणजी: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे(cyclone Tauktae) झालेल्या पडझडीचा परिणाम गोव्यातील वीज (Goa Electricity Cut) व पाणीपुरवठ्यावर(Goa water supply) झाला आहे. अनेक ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा(Electricity cut off) सुरळीत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी कसोसीने प्रयत्न करती आहेत. कालही भर पावसात वीज कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत होते.(Delay in connecting broken power lines in opposition constituencies)

युद्धपातळीवर हे काम सुरू असले तरी 50 टक्केच काम आतापर्यंत झाले आहे. ताळगावातील काही भागात दोन दिवसांतच वीजपुरवठा सुरळीत झाला. पर्वरीमध्ये स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी वीज कार्यालयातच धडक दिल्यानंतर पर्वरीतील अनेक भागातील वीजपुरवठा सुरू झाला. यावरून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात भेदभाव केला जात असल्याची लोकांमध्ये चर्चा होत आहे. विरोधकांच्या मतदारसंघात जाणुनबुजून तुटलेल्या वीजवाहिन्या जोडण्याच्या कामात विलंब लावला जात आहे.

वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मतदारसंघातील लोक आपापल्या मंत्र्यांना तसेच आमदारांना फोन करत आहेत. वीज अभियंत्यांना मंत्री किंवा आमदारांचे फोन आल्यावर वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन देतात व त्यानंतर फोनच बंद ठेवत आहेत. लोकांनी वीज कार्यालयात संपर्क साधल्यास फोन बंद असल्याची सूचना ऐकायला मिळते. उच्च दाबाचा वीजपुरवठा करणारी वीजवाहिनीचे सुमारे 100 हून अधिक खांब मोडून पडले आहेत. निकामी झालेल्या डीटीसी वितरण ट्रान्स्फॉर्मर केंद्रांची संख्या सुमारे 30 पेक्षा अधिक आहे तर 200 डीटीसीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला आहे. 5 पेक्षा अधिक 33 केव्ही क्षमता असलेले टॉवर्स उखडून पडले आहेत. प्रत्येकी पाचशेहून अधिक विद्युतवाहक (कंडक्टर्स) तसेच विद्युतरोधक (इन्सुलेटर्स) नादुरुस्त झाले.

सुमारे1.11 कोटींचे नुकसान 
राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या तीन दिवसांत अग्निशमन दलाला 1387 कॉल्स आले. त्यामध्ये विविध प्रकारची झाडे पडल्याचे, वीज ट्रान्स्फॉर्मर तसेच वीज खांब पडणे याचा समावेश होता. या एकूण आलेल्या कॉल्सपैकी 599 कॉल्स हातावेगळे करण्यात आले आहेत, तर अजूनही 788 कॉल्सची कामे बाकी आहेत. या चक्रीवादळामुळे राज्यात सुमारे 1.11 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com