IFFI 2022| 53 व्या IFFI साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात

IFFI 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार असुन; प्रतिनिधी my.iffigoa.org वर नोंदणी करू शकतात
Goa IFFI News Updates
Goa IFFI News Updates Dainik Gomantak

गोवा: IFFI 2022 साठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे; IFFI 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार असुन; प्रतिनिधी my.iffigoa.org वर नोंदणी करू शकतात, या करीता नोंदणी करण्यासाठी, https://my.iffigoa.org या वेबसाईटला भेट द्या.

(Delegate Registration for the 53rd IFFI is now open)

Goa IFFI News Updates
Goa Murder Case| सिद्धी नाईकच्या मृत्यूचा उलगडा पोलिस का लावू शकले नाहीत? नेटकऱ्यांचा सवाल

भविष्यातील इफ्फी च्या (IFFI) नियोजनाचा प्रारंभ इफ्फीत येणारे सिनेनिर्माते, दिग्दर्शकांसोबतच्या विचारविनिमयातून होऊ शकतो. स्थिरावणाऱ्या इफ्फीमुळे तसेच त्यातून पर्यटन, व्यावसायिक क्षेत्राला आर्थिक बळ मिळत असल्याने इफ्फीचे अधिक नेटके आयोजन व्हावे, याचीही काळजी घ्यावी लागेल. इफ्फीत जगाच्या कानाकोपऱ्यातील सिनेमाबरोबरच सिनेनिर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, गायक तसेच सिनेक्षेत्राशी निगडित प्रतिनिधी राज्यात येतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने इफ्फी वैश्विक होतो.

इफ्फीसाठी गोव्यात नव्या साधनसुविधा उभाराव्याच लागतील

इफ्फीतून सरकारला फायदा, नुकसान किती होते, त्यापेक्षा राज्याच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊनच इफ्फीसाठी गोव्यात नव्या साधनसुविधा उभाराव्याच लागतील. जागतिक किंवा देशातील उद्योजकांच्या सहकार्याने येत्या दोन-तीन वर्षांत त्या उभारणे शक्य आहे. राज्य सरकारला इफ्फीसाठी पूरक साधनसुविधांच्या बांधणीची योजना केंद्र सरकारला सादर करून केंद्रीय निधी मिळवता येईल. इफ्फीतील सिनेमा व्हर्चुअल माध्यमातून जगातही पोचतो. त्यामुळे कदाचित प्रतिनिधींची संख्या महोत्सवप्रेमींपुरती मर्यादित होऊ शकते, त्याचाही विचार साधनसुविधा उभारताना करावाच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com