दिल्लीत लाखोंची चोरी करणाऱ्या तरूणांना गोव्यात अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

दक्षिण दिल्लीतील एका व्यक्तीकडून २ लाख ४५ हजार ३४० रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी गोव्यामध्ये एका 26 वर्षीय तरूणी आणि तिच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली.

पणजी : दक्षिण दिल्लीतील एका व्यक्तीकडून २ लाख ४५ हजार ३४० रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी गोव्यामध्ये एका 26 वर्षीय तरूणी आणि तिच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली. सदर तरूणी ही व्यवसायाने सोशल मिडीया इन्फ्लूएन्सर आहे. लुटलेले पैसे गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्यासाठी आणि पोकर खेळण्यासाठी वापरला गेला आहे.

सदर तरूणाचे नाव अमृता सेठी असून, ती दिल्लीतील राजौरी गार्डनमधील रहिवासी आहे. अक्षित झांब आणि कुशल अशी तिच्या मित्रांची नावे असून, ते तिलक नगर येथे वास्तव्यास आहेत. मनोज सूद नावाच्या व्यक्तीने यांच्याविरूद्ध ५ नोव्हेंबर रोजी हौज खास पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सूदने सांगितले की, त्याच्या मालकाने त्याला एका ग्राहकाला 3,300 डॉलर्स देण्याची व त्या बदल्यात 2,45,340 रुपये परत घेण्यास सांगितले होते. क्लायंटने त्याला पंचशील पार्क येथे येण्यास सांगितले. सूद त्या ठिकाणी पोचला आणि सेठी आणि झांब यांना भेटला ज्यांनी त्याला गाडीत बसण्यास सांगितले. सेठी आणि झांब यांनी तक्रारदाराला ती अमेरिकन डॉलर्स देण्यास सांगितले पण सूद यांनी नकार दिला आणि आरोपीला एक्सचेंजचे पैसे मागितले.

यानंतर रोख रक्कम काढण्याच्या बहाण्याने आरोपी जवळच्या एटीएमवर गेले. इतक्यात तरूणी कारमधून बाहेर पडली आणि त्याला परदेशी चलन दाखवायला सांगितले. जेव्हा सूदने त्यांना अमेरिकन डॉलर दाखवले तेव्हा आरोपींनी बॅग हिसकावून घेतली आणि त्यांच्या कारने घटनास्थळावरून पळ काढला. तपासादरम्यान गुन्ह्यांच्या जागेच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींना वापरलेल्या कारचा नोंदणी क्रमांक ओळखला गेला. आरोपींनी वापरलेली गाडी रवींदर नाथ राखेजाच्या नावे नोंदविण्यात आली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, राखेजाने त्याचा मुलगा कुशल आणि त्याचे मित्र अमृता आणि अक्षित यांनी कार उधार घेतले आहे.

तांत्रिक देखरेखीनंतर आरोपी गोव्यात अस्याचे कळाले. गोवा पोलिसांनी दिल्ली पोलिसांना मदत केली आणि आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. आरोपी अमृता, अक्षित आणि कुशल यांना गोवा कोर्टात हजर केले असता तीन दिवसांच्या ट्रांजिट रिमांडची मागणी करण्यात आली. शुक्रवारी आरोपींना दिल्लीला पाठविले जाईल. 

आधिक वाचा : 

गोवा सरकारची साप्ताहिक लॉटरी 23 नोव्हेंबरपासून सुरू 

गोव्यातील उपनिरीक्षक सुनील गुडलर खात्‍यांतर्गत चौकशीत दोषी

नो पार्कींग मधील गाड्यांवरील कारवाईसाठी पणजीचे महापौर ग्राउंडवर

 

 

संबंधित बातम्या