दिल्ली सरकारने वीज दराचा अभ्यास केला तर राज्य सरकार प्रवास खर्च देईल: विजमंत्री काब्राल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

विजमंत्री नीलेश काब्राल यांनी गोवा सरकारचे विजदर कमी असल्याचा दावा केला. दिल्ली सरकारच्या तुलनेत गोवा सरकारचे विजदर खूपच कमी असल्याचे ते सांगत होते. सरकारने वीजदराचा आधी अभ्यास करावा आणि मगच बोलावे असा टोमणा ही त्यांनी मारला.

पणजी : विजमंत्री नीलेश काब्राल यांनी गोवा सरकारचे विजदर कमी असल्याचा दावा केला. दिल्ली सरकारच्या तुलनेत गोवा सरकारचे विजदर खूपच कमी असल्याचे ते सांगत होते. सरकारने वीजदराचा आधी अभ्यास करावा आणि मगच बोलावे असा टोमणा ही त्यांनी मारला.

काब्राल म्हणाले की, दिल्ली सरकार्फे ० ते २०० युनिचपर्यंत मोफत वीज देण्यात येत असली तरी २०० युनिटनंतर तेथिल दर अत्यंत महागडे आहेत. ते दर १४ रू. प्रति युनिटपर्यंत जातात तर गोव्यातील कमाल दर ४ रू. प्रति युनिट आहे. त्यापेक्षा जास्त दर गोव्यात नाही याची जाणीव आपच्या दिल्ली सरकारने ठेवावी.

गोव्याचे विजदर देशात सर्वात कमी

गोव्यात विज तयार होत नाही तर ती बाहेरून आणून, विकत घेऊन पुरवावी लागते. गोव्यातील दर १.२० रू. प्रति युनिट पासून सुरू होतात आणि जास्तीत जास्त दर ४ रू. एवढा असतो. दिल्ली चे दर २०० युनिटनंतर ४ रू. प्रति युनिट पासून सुरू होतात आणि ते १४ रू. प्रति युनिट पर्यंत वाढवण्यात आलेले आहे.

दिल्ली सरकारने आधी अभ्यास करावा दोन्ही राज्यातील विजदरांची तुलना केली तर गोव्यातील दर दिल्लीपेक्षी कितीतरी पटीने स्वस्त आहेत, असे स्पष्टीकरण काब्राल यांनी दिले. गोव्यात येवून दिल्ली सरकारने वीजदराचा अभ्यास केल्यास प्रवास खर्च देण्याची तयारी काब्राल यांनी दाखवली आहे. गोव्यात अनेक योजना आहेत त्या दिल्ली सरकारकडे आहेत का? असा प्रश्न ही उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या