‘दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांनी चर्चेसाठी यावे’

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

गोव्यातील वीज पुरवठ्याबाबत वादविवादाचे आव्हान मी कोणाला दिलेले नाही. तरीही आम आदमी पक्षाला याविषयावर वादविवाद हवा असेल, तर दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांनी चर्चेसाठी यावे

पणजी : गोव्यातील वीज पुरवठ्याबाबत वादविवादाचे आव्हान मी कोणाला दिलेले नाही. तरीही आम आदमी पक्षाला याविषयावर वादविवाद हवा असेल, तर दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांनी चर्चेसाठी यावे, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज पर्वरी येथे सांगितले. ते म्हणाले,

मी कोणालाही याविषयावर आव्हान दिलेले नाही. काहीजण गोवा सरकारने दिल्लीच्या वीज पुरवठा धोरणापासून शिकावे असा न मागता सल्ला देत होते. त्यावर बोलताना मी गोव्याची स्थिती भिन्न आहे, दिल्लीची भिन्न. त्यामुळे कोणाला हवे असेल तर गोव्याच्या वीज पुरवठ्याचा अभ्यास करावा. त्याविषयी माहिती घ्यावी असे मी म्हणालो होतो. त्यात कुठेही आव्हान देण्याचा अभिनिवेश नव्हता. तरीही याविषयावर खुली चर्चा करायचीच असेल तर राज शिष्टाचारानुसार दिल्लीच्या उर्जामंत्र्यांशीच मी चर्चा करू शकतो. कोणत्या तरी आमदार आणि जल मंडळाच्या अध्यक्षाशी मी चर्चा करू इच्छीत नाही. दिल्लीचे आदमार राघव चढ्ढा गोव्यात येणार आहे असे मी वर्तमानपत्रात वाचले आहे त्यांचे माझ्या कार्यालयात स्वागत आहे.

संबंधित बातम्या