Tourist Attacked in Anjuna: पुन्हा गोव्यात जाऊ शकणार नाही; दिल्लीच्या 'त्या' पर्यटकाने सांगितला थरारक अनुभव

व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.
Tourist Attacked in Anjuna
Tourist Attacked in AnjunaDainik Gomantak

Tourist Attacked in Anjuna: दिल्लीतील पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर चार स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केला. यात तिघेजण गंभीर जखमी होऊनही हणजूण (Anjuna) पोलिसांनी किरकोळ हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, दिल्लीत परतलेल्या या पर्यटक कुटुंबीयांनी गोव्यातील त्यांचा थरारक अनुभव कथन केला आहे. तसेच, त्यांची पुन्हा गोव्यात यायची इच्छा होणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

Tourist Attacked in Anjuna
Anjuna Tourist Attacked : दिल्‍लीतील पर्यटक कुटुंबावर सुरीहल्‍ला; हणजूण येथील घटना

“गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही गोव्याला जायचे नियोजन करत होतो. गोव्यात मी पहिल्यांदाच आलो होतो. पण, माझ्यावर ज्या प्रकारे चाकू आणि बेल्टने हल्ला करण्यात आला, मी त्याठिकाणी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही,” असे 24 वर्षीय जतिन शर्मा (Jatin Sharma) म्हणाले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला जतिन यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोव्यातील घटनेचे पुन्हा कथन कले.

"माझी आई, बहिण यांच्यासह आम्ही सातजण 05 मार्च रोजी गोव्यात पोहोचलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये असताना, एका हॉटेल कर्मचाऱ्याने असभ्य कमेन्ट केली. आम्ही हॉटेल प्रशासनाला यााबाबत माहिती दिली. तर, आम्ही आहे तोपर्यंत त्यांनी संबधित कर्मचाऱ्याला निलंबित केले."

"त्यानंतर संतापलेल्या कर्मचाऱ्याने धमकी देण्यास सुरूवात केली. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास रॉयस्टन रेजिनाल्डो डायस, त्याचा भाऊ नायरॉन रेजिनाल्डो डायस (दोघे रा. डिमेलो वाडा, हणजुण) यांनी आमच्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला केला." असे जतिन शर्मा म्हणाले.

Tourist Attacked in Anjuna
Tourist Attacked in Goa:पर्यटक प्राणघातक हल्ला प्रकरण: मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेचे स्‍वागत

हल्लेखोरांनी माझे वडिल, काका यांच्यावर देखील हल्ला केला यात दोघेही गंभीर जखमी झाले. याशिवाय माझी बहिण, भाची हे देखील त्याच ठिकाणी होते, रडत होते तरी देखील हल्लेखोर थांबले नाहीत, त्यांनी माझ्यावर वार केले असे शर्मा म्हणाले.

दरम्यान, जतिन याचे काका अश्विनी कुमार (वय 47) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.

दरम्यान, हणजूण (Anjuna) येथील घडलेली हिंसक घटना धक्कादायक आणि असह्य आहे. मी पोलिसांना दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे समाजकंटक हे राज्यातील लोकांच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ट्विट करत माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com