Goa: मुग्धाच्या गायनाने दिल्लीवासीय मंत्रमुग्ध

दिल्लीतील संगीत प्रतिभा व्हर्चुअल महोत्सवात गोव्याच्या (Goa)मुग्धा गावकरने आपले गायन सादर केले.
Goa: मुग्धाच्या गायनाने दिल्लीवासीय मंत्रमुग्ध
Goa: Mugdha gaonkar singing in DilhliDainik Gomantak

फातोर्डा: Goa: नवी दिल्ली येथील संगीत (Music) नाटक (Drama) अकादमीने पश्र्चिम विभागीय (west )युवा संगीतकार व गायकांसाठी संगीत प्रतिभा हा व्हर्चुअल महोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमात गायन सादर करण्यासाठी गोव्याची प्रतिभाशाली शास्त्रीय गायिका मुग्धा गावकर हिने गायन सादर केले. मुग्धाने या कार्यक्रमात ‘राग गोरख कल्याण’ हा राग प्रस्तुत केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु-ट्युबवरुन (You Tube) संपुर्ण देशात करण्यात आले.

Goa: Mugdha gaonkar singing in Dilhli
Plan Goa trip: निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे गोव्यातील एक सुंदर गाव

या कार्यक्रमात मुग्धाला हार्मोनियमवर (Harmonium) अनय घाटे, तबल्यावर संकेत खलप व तानपुऱ्यावर प्रथा गावकर व मेघा गोबरे यांनी संगीत (Music) साथ दिली. हा कार्यक्रम महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सुरु झाला. हा कार्यक्रम ३ तास चालला. मुग्धा गावकरने शिवाजी विद्यापीठामध्ये (Shivaji Univercity) गायनांमध्ये मास्टर्स (Master Degree) पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली असुन तीने ‘संगीत विशारद’ ही पदवीही प्राप्त केली आहे. २०१४ साली तिला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत प्रतिभा महोत्सवात हृषिकेश मजुमदारने बासरी वादन, जुई घायगुडे पांडेने गायन, अभिषेक बोरकरने सरोदवादन व हृषिकेश सुरवरोने तबला वादन सादर केले.

Goa: Mugdha gaonkar singing in Dilhli
Nelson Mandela Nobel Peace Award: सिद्धेश नाईक यांना नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट प्रदान

या कार्यक्रमात गायन सादर करण्यासाठी गोव्याची प्रतिभाशाली शास्त्रीय गायिका मुग्धा गावकर हिने गायन सादर केले. मुग्धाने या कार्यक्रमात ‘राग गोरख कल्याण’ हा राग प्रस्तुत केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु-ट्युबवरुन संपुर्ण देशात करण्यात आले.

Related Stories

No stories found.