गोवा शिगमोत्सव राज्यभर सादर करण्याची कलाकारांची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

फोंड्यातील क्रांती मैदानावर जमा झालेल्या राज्यभरातील कलाकारांनी शिगमोत्सव सादरीकरण हे केवळ तीन ठिकाणी मर्यादित न राहता इतर ठिकाणीही व्हावे आणि कलाकारांना योग्य संधी द्यावी, असे आवाहन केले. 

फोंडा: राज्यातील सरकारी शिगमोत्सव सर्वच ठिकाणी साजरा करण्याची मागणी कलाकारांनी केली आहे. फोंड्यातील क्रांती मैदानावर जमा झालेल्या राज्यभरातील कलाकारांनी शिगमोत्सव  सादरीकरण हे केवळ तीन ठिकाणी मर्यादित न राहता इतर ठिकाणीही व्हावे आणि कलाकारांना योग्य संधी द्यावी, असे आवाहन केले. 

यावेळी कलाकारांपैकी प्रद्युम्न नाईक व इतरांनी आपली बाजू मांडताना यंदाच्या शिगमोत्सवात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसून केवळ कलाकारांचे हीत समोर ठेवूनच हा शिगमोत्सव सादर करावा, अशी मागणी केली. 

दरवर्षी शिगमोत्सव सादरीकरणावेळी चित्ररथ तसेच इतर कलेच्या बाबतीत सादरीकरणासाठी विविध पथकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. राज्यभरात विविध ठिकाणी सरकारी शिगमोत्सवात या कलाकारांनी आपली कला पेश करण्याची संधी दिली जाते, त्यामुळे बक्षिसाच्या रुपाने कलाकारांचे है पैसे वसूल होतात. यंदा मात्र कोरोना व इतर कारण पुढे करून हा शिगमोत्सव  केवळ तीनच ठिकाणी ठेवण्यात आल्याने एवढा मोठा खर्च करूनही कलाकार व पथकांना नुकसानी सहन करावी लागणार असून सरकारने या निर्णयात बदल करून हा शिगमोत्सव राज्यपातळीवर सर्व ठिकाणी सादर करावा, अशी मागणी केली.

पिलियन रायडर्स बनताहेत वाटाड्या; गोव्याच्या वाहतूक पोलिसांची वाढलीये डोकेदुखी 

संबंधित बातम्या