हवाई इंधनाची मागणी घटली!

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

कोविड महामारीच्या काळात हवाई वाहतुकीवर निर्बंध आले. त्यामुळे हवाई इंधनाची मागणी कमालीची घटली.

पणजी: कोविड महामारीच्या काळात हवाई वाहतुकीवर निर्बंध आले. त्यामुळे हवाई इंधनाची मागणी कमालीची घटली. गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू झाल्यामुळे देशातील हवाई इंधनाची मागणी आता ६० टक्क्यांवर पोचली आहे. अद्यापही ४० टक्के मागणी कधी होईल याच्या प्रतीक्षेत कंपन्या आहेत. इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक (हवाई इंधन) संजय सहाय यांनी हे निरीक्षण नोंदवले.

एका कार्यक्रमासाठी ते गोव्यात आले असता मुरगाव बंदर परिसरात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे निरीक्षण नोंदवले. आता कोविडवरील लस आली आहे. त्यानंतर लोक हवाई प्रवास पूर्ववत करू लागतील आणि हवाई इंधनाची मागणी विमान कंपन्या पूर्ववत नोंदवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या