गोव्यातील कार्निव्हल रद्द करण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

गोव्यात 13 आणि 14 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आलेला कार्निव्हल रद्द केला जावा अशी मागणी पणजीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

पणजी: गोव्यात 13 आणि 14 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आलेला कार्निव्हल रद्द केला जावा अशी मागणी पणजीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. पणजीतील सांबा स्क्वेअर भागात चार दिवसाचा कार्निवल आयोजित केला जाऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार गोविंद महामारी अद्याप संपुष्टात आलेली नाही. लोक मुखावरणे वापरत नाहीत, शारीरिक अंतराचे बंधन पाळत नाहीत. यामुळे कार्निवल महोत्सवात मोठी गर्दी होईल आणि कोविडचा प्रसार सगळीकडे होईल. कोविड महामारीतून सगळ्यांना वाचवण्यासाठी यंदा सरकारने कार्निव्हल साजरा करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोप विमानतळ प्रकल्पासाठी स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न -

संबंधित बातम्या