म्हापशातील ‘नागरिक सेवा केंद्र’ असुरक्षित

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने म्हापसा कदंब बसस्थानाच्या परिसरात सुलभ शौचालयाच्या बाजूला कार्यान्वित केलेले ‘नागरिक सेवा केंद्र’ तेथील एकंदर स्थितीमुळे लोकांच्या दृष्टीने असुरक्षित असून, यासंदर्भात उपाययोजना हाती घेण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ‘गोवा कॅन’ संस्थेचे संघटक रोलंड मार्टिन्स यांनी म्हापसा येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

म्हापसा: राज्य सरकारने म्हापसा कदंब बसस्थानाच्या परिसरात सुलभ शौचालयाच्या बाजूला कार्यान्वित केलेले ‘नागरिक सेवा केंद्र’ तेथील एकंदर स्थितीमुळे लोकांच्या दृष्टीने असुरक्षित असून, यासंदर्भात उपाययोजना हाती घेण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ‘गोवा कॅन’ संस्थेचे संघटक रोलंड मार्टिन्स यांनी म्हापसा येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.उपजिल्हाधिकारी अक्षय पोटेकर यांना दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की हे केंद्र कार्यान्वित झाले ही चांगलीच बाब आहे.

तिनिधीशी बोलताना श्री. मार्टिन्स म्हणाले, तेथील गंजलेल्या जाळीदार कुंपणाचा त्रास सहन करूनच सर्वसामान्य लोकांना केंद्राच्या सेवेचा लाभ घ्यावा लागतो. ते कुंपण अगदीच इमारतीला लागूनच अर्थांत अवघ्याच मीटरभर अंतरावर असून, तेथील फरशीयुक्त भूभाग खूपच उतरणीयुक्त असल्याने ते लोकांना त्रासदायक होत आहे. तिथे लोकांना धड उभेही राहता येत नाही.

शहरात दिवसरात्र भटकणाऱ्या गुरांना व कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच लोकांनी तिथे कचरा टाकू नये यासाठी ते कुंपण उभारण्यात आले असले तरी धोकायदायक तथा आरोग्यास अपायकारक असलेले ते गंजलेले कुंपण हटून त्या ठिकाणी जनतेच्या हितार्थ पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यातील अन्य नागरिक सेवा केंद्रांमध्ये मुख्य प्रवेशद्वारातून लोकांना प्रवेश दिला जातो व सध्या कोविडमुळे त्या केंद्रांत लोकांनी आत प्रवेश करू नये म्हणून प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एखादे टेबल घालून अडथळा निर्माण केला जातो. तिथेच एका वेळेस केवळ एका व्यक्तीला सेवा दिली जाते व सध्याच्या महामारीच्या काळात ते योग्यच आहे, असे स्पष्ट करून श्री. मार्टिन्स म्हणाले, म्हापशातील या केंद्रात भलतीच पद्धत अवलंबली जात आहे. वास्तविक, हवा आत यावी म्हणून त्या इमारतीसाठी खिडक्यांची तजवीज केली आहे. तथापि, म्हापशात अशा खिडक्यांचा वापर लोकांना सेवा देण्यासाठी केला जातो, हे अतिशय आश्चर्यकारक आहे. ती खिडकी धोकादायक गंजलेल्या कुंपणाला लागूनच असल्याने हा एकंदर 

संबंधित बातम्या