हजसाठी गोव्यातून विमानसेवेची मागणी: सैफुल्ला खान

दैनिक गोमंतक
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

हाज यात्रेला गोव्यातून असलेली  विमानसेवा कोरोना महामारी मुळे केली रद्द केली आहे की  कायमस्वरूपी रद्द केली याविषयी खुलासा   गोवा हाज समितीचे अध्यक्ष शेख जिना यांनी करावा अशी मागणी श्री. खान यांनी केली

मुरगाव : २००९ पासून काॅंग्रेस राजवटीत दाबोळी विमानतळावरून हाज यात्रेला जाण्यासाठी विमानसेवा होती ती यंदा रद्द करण्यात आली आहे ती पुनःश्‍च कार्यन्वित करावी अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव तथा मुरगावचे माजी नगरसेवक सैफुल्ला खान यांनी केली आहे.तसेच गोव्यात हाज हाऊस सुरू करावे अशीही मागणी त्यांनी केली.

हाज यात्रेला गोव्यातून असलेली  विमानसेवा कोरोना महामारी मुळे केली रद्द केली आहे की  कायमस्वरूपी रद्द केली याविषयी खुलासा   गोवा हाज समितीचे अध्यक्ष शेख जिना यांनी करावा अशी मागणी श्री. खान यांनी केली  आहे   हाज यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काॅंग्रेस सरकारने दाबोळी विमानतळावरून यात्रेकरूंसाठी काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००९ साली थेट विमानसेवा उपलब्ध करून दिली होती. याचा फायदा गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्‍यातील यात्रेकरुं उठवित होते. तसेच ही विमानसेवा त्यांना सोईस्कर व सुखकर झाली होती. दरम्यान यंदा कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध आलेले असून हाज यात्रेकरूंच्या हवाई सेवेवर परिणाम झाला आहे.

यंदा दाबोळीवरून हाज यात्रेकरूसाठी विशेष सेवेचे उड्डाण होणार नाही. त्यामुळे गोव्यातील व गोव्या शेजारच्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या काही भागातील शेकडो यात्रेकरूंना मुंबई गाठावी लागणार आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी त्रासदायक, खर्चिक आणि वेळ वाया घालवणारा असल्याने हाज यात्रेकरूमध्ये नाराजी पसरली आहे. 
  काॅंग्रेस सरकारच्या काळात यात्रेकरूंसाठी ही थेट मक्का पर्यंतची सेवा उपलब्ध करण्यात आली होती. ती एकदा खंडित झाली तर पुन्हा सुरू होणे कठीण होईल. गोव्यातून दरवर्षी दोन विमाने हाज यात्रेकरूसाठी मक्काला उड्डाण करतात. गोव्यातील दीडशेहून अधिक तर शेजारच्या राज्यातील यात्रेकरु सहभागी होत असतात. त्यामुळे या यात्रेकरूंसाठी किमान एक हवाईसेवा तरी दाबोळी विमानतळावरून उपलब्ध व्हायला हवी. नाहीतर आता दाबोळी विमानतळावरून जाणाऱ्या सर्व हाज यात्रेकरूना मुंबई गाठावी लागणार आहे. या यात्रेसाठी मुंबई पर्यंतचा प्रवास करणे विशेषता वृद्धासाठी फार त्रासदायक होणार असल्याचे सैफुल्ला खान यांनी सांगितले.

ऐनवेळी हाज यात्रेकरूंची सेवा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. हा प्रकार अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले.   दाबोळीतील विमान सेवा रद्द केल्याने गोवा आणि कर्नाटकातील यात्रेकरूंना चार दिवस आधीच मुंबई गाठावी  लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हाज समितीचे अध्यक्ष शेख जिना यांनी या गैरसोयीची दखल घेऊन ही सेवा पुन्हा उपलब्ध करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावे. राज्य व केंद्र सरकार समोर हा प्रश्न मांडावा अशी मागणी खान यांनी केली. शेख जिना केंद्रीय समितीवरही सदस्य आहेत. गोव्यात व केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. हाज यात्रेकरूंची गैरसोय दूर करणे त्यांना शक्य आहे. तसेच यापूर्वी राज्य सरकारने गोव्यातील व शेजारच्या राज्यातील यात्रेकरूंसाठी दाबोळी विमानतळाच्या जवळपास हाज हाऊस बांधण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासनही पूर्ण झालेले नसल्याचे ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या