गोव्यात काजूंची मागणी 60 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

गोव्यात रक्षाबंधनपासून काजूगरांचा बाजार तेजीत
गोव्यात काजूंची मागणी 60 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
Cashew

सासष्टी: सणासुदीच्या (Festival) काळात प्रक्रिया केलेल्या काजूगरांचा (Cashew) बाजार तेजीत असतो. सणासुदीला नेहमीपेक्षा दुप्पट उलाढाल होते. जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षांपासून काजूगरांना चांगली मागणी मिळत नव्हती. मात्र, यंदा रक्षाबंधन सणापासून काजूगरांचा बाजार तेजीत आहे. त्यातच गणेश चतुर्थी, (Ganesh Chaturthi) दिवाळीसारखा मोठा सण येणार असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा काजूची मागणी 60 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे सण, समारंभ, कार्यक्रम आदींवर पूर्णविराम लागला होता तर पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला होता. देशात तसेच गोव्यात प्रक्रिया केलेल्या काजूला ज्या प्रकारची मागणी मिळत होती, ती मागणी मिळत नव्हती. मात्र, यंदा जुलै महिन्यापासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने देश तसेच गोव्याचा बाजारपेठेत काजूची मागणी वाढलेली दिसून येत आहे. मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात काजूला चांगली मिळाली नाही. पण, जुलै महिन्यापासून मागणीत वाढ झाली असून कोरोनाची तिसरी लाट न आल्यास दिवाळीच्या सणात ही मागणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झाट्ये यांनी दिली.

Cashew
Goa: 'हॉटेल्स, शॅक्स,पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्या'

सर्वत्र देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस विरुध्द लढण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली असून भारतात 2021- 22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे यंदा भारतात काजूला मागणी वाढणार आहे. गेल्यावर्षी कोविडच्या आधी काजूची निर्यात करण्यात आल्यामुळे 2019- 20 या आर्थिक वर्षात निर्यात वाढली होती. 2020 - 21 या आर्थिक वर्षात काही प्रमाणात निर्यात कमी झाली होती तर यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे, असे सिध्दार्थ झाट्ये यांनी सांगितले.

Cashew
Goa: नोकऱ्या देताना जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नका; खासदार 'फ्रान्सिस सार्दीन'

भारतात काजूच्या तुकड्याचा वापर बिठाई, स्नेक्स आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनामुळे हॉटेल तसेच बिठाई दुकाने संथगतीने चालू असल्यामुळे काजूच्या तुकड्याना जास्त मागणी मिळत नव्हती. पण, यंदापासून काजूच्या तुकड्याना मागणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी गोव्यातील अनेक कारखानदारानी कोरोनाच्या भीतीने कारखाने सुरु केलेले नव्हते. मात्र, यंदा कोरोना नियंत्रणात येऊ लागल्याने सर्वांनी कारखाने सुरू केले आहेत, असे सिध्दार्थ झाट्ये यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com