Goa Ganesh Chaturthi 2023: राज्यात चॉकलेट मोदकांना मागणी

Goa Ganesh Chaturthi 2023: ट्रेंड बदलतोय : करंज्‍या, लाडू, सुकामेवाही विक्रीस
Goa Ganesh Chaturthi 2023:
Goa Ganesh Chaturthi 2023: Dainik Gomantak

गंगाराम आवणे

Goa Ganesh Chaturthi 2023: राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. घर सजवणे, करंज्या, लाडू, मोदक करणे सुरू झाले आहे. परंतु काळाप्रमाणे या उत्सवात नवनवीन ट्रेंड येत आहेत. पारंपरिक मोदकांसोबतच चॉकलेट मोदक तसेच सुकामेवा मोदकांची मागणी वाढली आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023:
Meenaskhi Lekhi Goa Visit: प्राचीन काळापासून भारतामध्ये जहाजबांधणीची अखंड परंपरा: मीनाक्षी लेखी

त्यातही हे पदार्थ घरगुती पद्धतीने उपलब्ध झाल्यास अधिकच उत्तम. लोक आवर्जून ते खरेदी करताना दिसतात. मेरशीतील नवउद्योजक हिना गोलतेकर या मागील काही वर्षांपासून चॉकलेट मोदक बनवित आहेत. या मोदकांसाठी मागणी वाढतच आहे.

कोरोनाच्या काळात एक हौस म्हणून मी हे पदार्थ करायला सुरूवात केली. लोकांना ते आवडू लागले. मागणी वाढली. आता मी माझी स्वतःची बेकरी उभारली असून, केवळ शाकाहारी केक बनविते, असे त्यांनी सांगितले.

तरुणाईच्‍या पसंतीला प्राधान्‍य

आजच्या तरुणाईला नावीन्य हवे असते. त्यामुळे चॉकलेट, सुकामेवा, मोतीचूर, पान फ्लेवर आदी विविधांगी मोदकांना पसंती दिली जाते. ज्यांना गणेशोत्सवाच्‍या काळात आपले नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या घरी जायचे असते, ते या मोदकांना अधिक पसंती देतात, असे हिना गोलतेकर यांनी सांगितले.

मोदक बनविण्‍याच्‍या कामात मला माझी आई मदत करते. ही उत्‍पादने अधिक प्रमाणात वाढवून त्‍याचे उद्योगात रुपांतर करण्याच्या विचार आहे. मी माझे आकाशवाणी व दूरदर्शनवरील निवेदकाचे काम सांभाळत उर्वरित वेळेत ही आवड जोपासत आहे.

- हिना गोलतेकर, मेरशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com