वास्कोतील ‘तो’ फलक त्वरित हटवण्याची मागणी

वास्को शहरात इस्पितळासमोर वाहनांची वेगमर्यादा प्रती तास 50 कि. मी. असा फलक लावण्यात आल्याने लोक अचंबित झाले आहेत. पूर्वी या मार्गावर 30 प्रती कि. मी. वेगमर्यादा दाखवणारा फलक होता.
Vasco Speed Limit Board
Vasco Speed Limit Board Dainik Gomantak

वास्को : वास्को शहरात इस्पितळासमोर वाहनांची वेगमर्यादा प्रती तास 50 कि. मी. असा फलक लावण्यात आल्याने लोक अचंबित झाले आहेत. पूर्वी या मार्गावर 30 प्रती कि. मी. वेगमर्यादा दाखवणारा फलक होता.

Vasco Speed Limit Board
सुरी हल्ल्याप्रकरणी जॅक्सन फेर्राव याची जामिनावर सुटका

तो हटवून नवीन फलक लावण्याचा अजब प्रकार संबंधितांनी केला आहे. हा फलक त्वरित हटवण्यात यावा, अशी मागणी होत आहे. वास्को शहरातील एफएल गोम्स मार्गावर टिळक मैदानासमोर इस्पितळाशेजारी वाहनांची वेगमर्यादा दाखवणारा फलक हल्लीच लावण्यात आला आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग शहरी भागात असून, या मार्गावर शेकडो कार्यालये, दुकाने व आस्थापने आहेत. तसेच लोकांच्या वर्दळीबरोबर वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर अपघातही खूप घडतात. संबंधितांनी डोळेझाक करून फलक लावले आहेत. पूर्वी या मार्गावर 30 कि. मी. ताशी वेग असा फलक होता. तो हटवून आता नवीन फलक लावण्यात आला आहे, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com