बेकरी व्यवसाय गोवेकरांच्या हातात राहावा, असे सरकारला वाटत असेल तर...

गोव्यातील बेकरी व्यवसायात परप्रांतियांची संख्या जास्त
Demand for subsidy to bakery business To Goa  government
Demand for subsidy to bakery business To Goa governmentDainik Gomantak

मडगाव: बेकरी व्यवसायात (Bakery Business) परप्रांतियांची संख्या मोठी झालेली आहे. अवघे 10 टक्केच गोमंतकीय बेकरी व्यवसायात शिल्लक आहेत. हा व्यवसाय गोवेकरांच्या हातात राहावा, असे सरकारला (Goa Government) वाटत असेल, तर त्याने या पारंपरिक बेकरांना अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल गोवा बेकर्स ॲण्ड कन्फेक्शनरी असोसिएशनचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी केली आहे.

Demand for subsidy to bakery business To Goa  government
पावाच्या किंमतीवरून बेकर्स संघटनांमध्ये मतभेद

जागतिक बेकर्स दिनानिमित्त शनिवारी येथील होली स्पिरीट चर्चमध्ये कृतज्ञता मासानंतर बोलताना ते म्हणाले की, सहा वर्षांनंतर पाव एक रुपयाने वाढविला आहे, याची नोंद गोवेकरांनी घ्यावी व पदेरांच्या समस्याही समजून घ्याव्यात. या व्यवसायात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात शिरले आहेत व त्यांनी असंख्य बेकरी उत्पादने सुरू करून त्यावर नियंत्रण मिळविले आहे. त्यांच्या गैरप्रकारांकडे एफडीए व प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करते, असा ठपका त्यांनी ठेवला. त्यामुळे गोवेकरांच्या समस्यांत भर पडली आहे.

Demand for subsidy to bakery business To Goa  government
Goa: यंदाच्‍या पर्यटन हंगामात शॅक्‍स वाढण्याची शक्यता

लाकडाचे दर वाढले

आता अवघे 10 टक्के गोवेकर या व्यवसायात उरले आहेत. त्यांना सबसिडी मिळत नाही. जळावू लाकडाचे दर हाताबाहेर गेले आहेत. ती सहजपणे मिळत नाहीत व त्यामुळे समस्या वाढतात. प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांना गॅस वा डिझेल ओव्हनचा सल्ला देते पण त्याला साधारण अडीच लाख खर्च आहे, तो सरकारने सबसिडी वा प्रोत्साहकाच्या रुपाने दिला, तर त्यांना दिलासा मिळेल व हा व्यवसायही तग धरेल असेही फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com