Market: अळूमाडीच्या खरेदीला ग्राहकांकडून मागणी

१०० ते १५० रुपये प्रतिनग : इतर भाज्यांचे दर स्थिर; टोमॅटोच्या दरात चढउतार
Market
MarketDainik Gomantak

गोमंतकीय नागरिकांना ज्याप्रमाणे मासळी प्रिय आहे त्याप्रमाणेच काटेकणगी, अळूमाडी, निरफणस, भाजीची केळीदेखील अतिशय प्रिय आहेत. या भाज्यांना शहरी भागात अधिक मागणी असते. अळूमाडी ही विशिष्ट कालखंडातच मिळत असल्याने अनेक नागरिक तिची खरेदी करताना दिसतात.

पणजी बाजारात लांबीने आणि आकाराने मोठी असणारी अळूमाडी १०० ते १५० रुपये प्रतिनग दराने विकली जात असून नागरिकांचा अधिक कल हा स्थानिक माडी खरेदीकडे असतो. बेळगावहून देखील या अळूमाड्या येत असतात. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांकडूनच या माड्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे.

Market
Crime: फोंडा तालुक्यात सर्वाधिक चोऱ्यांच्या घटना

राज्यातील भाजीपाल्याचे भाव गेले दोन आठवडे स्थिर आहेत. कांदे, बटाट्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर असून केवळ टोमॅटोच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात भाजीपाल्यासह गावठी भाज्यांनाही चांगली मागणी आहे.

Market
Margao: ‘तीन महिने झाले तरी कचऱ्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाईना!’

गावठी भाज्यांना पसंती-

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात विविध प्रकारच्या पालेभाज्या प्रामुख्याने लालभाजी, मुळे, काही प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतल्याने ही गावठी भाजी बाजारात दाखल झाली असून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात या भाजीची खरेदी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com