Goa Gram Sabha: शिवोलीतील 'त्या' बारवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

Siolim: ध्वनिप्रदूषण तसेच, कायदा मोडणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Siolim Gram Sabha
Siolim Gram SabhaDainik Gomantak

Siolim: वाडी-शिवोलीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तलाशा बार व रेस्टॉरंटवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मर्ना-शिवोली ग्रामसभेत करण्यात आली. ध्वनिप्रदूषणावरून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांसमोर नमते घेत, सरपंच शर्मिला वेर्णेकर यांनी येत्या एक दोन दिवसांतच पंचायतीतर्फे वादग्रस्त रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

दरम्यान, तलाशा बार व रेस्टॉरंटवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत कार्यालयापासून संबंधित प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कार्यालयात अनेक वेळा करण्यात आली आहे. मार्ना-शिवोली पंचायत क्षेत्रात तलाशा व्यतिरिक्त अनेक छोटी-मोठी बार रेस्टॉरंट्स कार्यरत असून त्यामधून ध्वनिप्रदूषणाबरोबरच वेळेच्या मर्यादेचेही उल्लंघन होत असल्याचे शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर यांनी ग्रामसभेत सांगितले.

Siolim Gram Sabha
Goa Panchayat: निविदा प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार अन् अफरातफर! ग्रामस्थांचा आरोप

तसेच, कायदा मोडणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थ विक्टर फर्नांडिस यांनी पर्यटनाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण तसेच सामाजिक कलह निर्माण करणाऱ्या लोकांवर पंचायत मंडळाबरोबरच सरकारी पातळीवरूनही कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले. संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत औपचारिकता म्हणून काम न करता रात्रीच्या वेळेत किनारी भागांना भेट देत ध्वनिप्रदूषण कणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

Siolim Gram Sabha
Vishwajit Rane : मुख्यमंत्र्यांनी नाही; 'तो' निर्णय मीच घेतला

पंचायतीकडून पाहणी

काल सकाळी मार्ना-शिवोली पंचायत मंडळाकडून पंचायत सचिव चोडणकर यांच्यासह वाडी-शिवोलीतील त्या वादग्रस्त रेस्टॉरंटला भेट देत तेथील ध्वनिप्रदूषणावरून संबंधित मालक तसेच व्यवस्थापनाला पंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस तसेच सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती सरपंच शर्मिली वेर्णेकर यांनी बोलताना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com