'चोर्लातील रस्ता दुरुस्त करा'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

चोर्ला घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहतुकीस अत्यंत धोकादायक चोर्ला घाट बनलेला आहे. हा घाट येत्या पंधरा दिवसात दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन वाळपई रस्ता विभाग व उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना वाळपई काँग्रेस गट समितीतर्फे देण्यात आले आहे.

वाळपई :  चोर्ला घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहतुकीस अत्यंत धोकादायक चोर्ला घाट बनलेला आहे. हा घाट येत्या पंधरा दिवसात दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन वाळपई रस्ता विभाग व उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना वाळपई काँग्रेस गट समितीतर्फे देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, रोशन देसाई, कृष्णा नेने, नंदकुमार कोपार्डेकर, सुरेश कोदाळकर, श्री.  मराठे, महंमद खान आदींची उपस्थिती होती. चोर्ला घाटात असंख्य प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा चोर्ला घाट अठरा किलो मीटरचा आहे. त्या पूर्ण भागात सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. वाहन चालविणे जिकिरीचे बनले आहे.  येत्या पंधरा दिवसात रस्ता दुरुस्ती न केल्यास वाळपई काँग्रेस आंदोलन छेडणार आहे असे मांद्रेकर यांनी सांगितले. रस्ता विभागाच्या अधिकारी वर्गाने यावेळी सांगितले चोर्ला घाटातील रस्ता करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या