सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री मिलिंद नाईकांच्या राजीनाम्याची मागणी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरातील सर्वच नेते आता करू लागले आहेत.

पणजी: पाच पालिकांची निवडणूक रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिल्यानंतर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरातील सर्वच नेते आता करू लागले आहेत. त्यातच मिलिंद नाईक यांना आज आणखीन एक धक्का बसला. ते राहात असलेल्या सडा वास्को भागातील एक मातब्बर नेते नजीर खान यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मिलिंद नाईक हे भाजप सरकार मधील नगर विकास मंत्री आहेत. नजीर खान यांनी पणजी येथील काँग्रेस मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर मिलिंद नाईक यांच्या मनमानी पणाला कंटाळून त्यांना केवळ काँग्रेसच रोखू शकते याची खात्री पटल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

गोव्यातील त्या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर पुन्हा सर्वोच्च...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले चोडणकर यांनी यावेळी मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले, घटनेची शपथ घेऊन मंत्री पदावर येतात त्यानी घटनेतील तरतुदींची पायमल्ली केली आहे यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून  राजीनामा द्यावा.

संबंधित बातम्या