आंदोलकांनी दिला बंदचा इशारा...

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

काणकोणमधील चापोली धरणावर काढलेल्या अश्‍लील व्हिडिओ संदर्भात काणकोण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी जागृत काणकोणकार नागरिकांनी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन केली. त्याचप्रमाणे  दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी काणकोणात येऊन आंदोलकाना ठोस आश्र्वासन देण्याची मागणी केली.

 

काणकोण : काणकोणमधील चापोली धरणावर काढलेल्या अश्‍लील व्हिडिओ संदर्भात काणकोण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी जागृत काणकोणकार नागरिकांनी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन केली. त्याचप्रमाणे  दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी काणकोणात येऊन आंदोलकाना ठोस आश्र्वासन देण्याची मागणी केली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज सिंग यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, पोलिस निरीक्षक चव्हाण यांची बदली करण्याचे आश्वासन आंदोलकाना दिले. मात्र, त्यांच्या निलंबनाची मागणी धुडकावल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी गुरुवारी मडगाव-कारवार हमरस्ता बंद करून काणकोण बंदचा इशारा दिला.

बुधवारी सकाळी आंदोलकांनी काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आंदोलन छेडले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष प्रभू व पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण आंदोलकांना सामोरे गेले. त्यावेळी संशयितांकडे आम्ही न्याय मागत नसून पोलिस निरिक्षकाच्या वरिष्ठांना काणकोणात बोलावून ठोस आश्र्वासन देण्याची मागणी केली. त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मागणीचे लेखी निवेदन देण्याची विनंती आंदोलकांना केली. लेखी निवेदन आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन कारवाई करण्यासाठी स्वत: नेऊन देत असल्याचे आंदोलकाना सांगून त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक त्यांच्या विनंतीला बधले नाहीत. त्यांनी आपली मागणी लावून धरली. सुरवातीला उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बहुचर्चित मॉडेल व इतरांना घेऊन चापोली धरणावर गेलेल्या रिक्षा चालकाने आपण ३१ ऑक्टोबरला धरण परिसरात गेल्याचे उपअधीक्षक अल्बुकर्क यांना सांगितले. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसही त्यावेळी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या