Goa Board: दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा द्या!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

यंदा पहिली ते दहावी पर्यत क्रिडा क्षेत्रात योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांना यंदा क्रिडा गुणांना मुकण्याची पाळी येण्याची शक्यता बळावली आहे.

काणकोण: नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा 2014 पासून मिळत आहे. गेले शैक्षणिक वर्ष करोना महामारीत गेल्याने तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा स्पर्धा झाल्या नाहीत. (Demand for taking sports marks into the results of 10th standard students)

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने दहावीच्या परिक्षा रद्द केल्या. त्या विद्यार्थ्याचे शालेय पातळीवर मूल्यांकन कसे करावे, या संदर्भातील मार्गदर्शक  परिपत्रक सर्व शाळांना वेळेचे निर्बंध घालून पाठवून देण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये क्रिडा गुणाचा कुठेच उल्लेख नाही. मात्र प्रत्येक विषयाच्या शंभर गुणांच्या मूल्यांकन नववीतील दहा गुणांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Goa: दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या मग शुल्क परत मिळणार का? सविस्तर वृतांत

यंदा पहिली ते दहावी पर्यत क्रिडा क्षेत्रात योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांना यंदा क्रिडा गुणांना मुकण्याची पाळी येण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात तालुक्यातील काही क्रिडा शिक्षकाशी संपर्क साधला असता ही शंका रास्त असून यंदाच्या दहावी विद्यार्थ्यांना त्यांनी नववीत असताना केलेल्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीवर आधारित क्रिडा गुणाचा फायदा देणे योग्य ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या