Goa University: ‘पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पुन्हा सुरू करा’,विद्यार्थ्यांची मागणी

त्यामुळे उत्तरपत्रिकांची फेरतपासणी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे झाले आहे.
Goa University
Goa University Dainik Gomantak

पणजी: कोरोना काळात परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया थांबवली होती. मात्र, आता परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांची फेरतपासणी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे झाले आहे.

(Demand to Goa University 'restart the revaluation process')

Goa University
Goa Ganesh Chaturthi: 'चतुर्थीच्‍या' बाजारामुळे फोंड्यात वाहतूक कोंडी

त्यामुळे विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह अभाविपच्या पेडणे शाखेने केले आहे. या मागणीचे निवेदन अभाविपने महाविद्यालय प्रशासनास दिले आहे. महाविद्यालयाने विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी अभाविप कोकण प्रदेश सहमंत्री अवधूत कोटकर म्हणाले, याविषयी आम्ही गोवा विद्यापीठाचे दरवाजे ठोठावणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com