राज्यात डेंग्यू रुग्णांत वाढ, रुग्णसंख्या 69 वर

वाढत्या साथीमुळे स्वच्छता राखण्याचे आरोग्य खात्याकडून आवाहन
राज्यात डेंग्यू रुग्णांत वाढ, रुग्णसंख्या 69 वर
Dengue in GoaDainik Gomantak

पणजी : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. राजधानी पणजी, आर्थिक राजधानी मडगाव आणि कांदोळी परिसरात संशयित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या सभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्‍य खात्याने जनतेला केले आहे.

पणजीतील मुख्य शहरी भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. यात मोठ्या संख्येत कॅसिनो कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य खात्याने संसर्गाचा स्रोत जाणून घेण्यासाठी तपास केल्यानंतर कॅसिनो अस्थापने असलेल्या ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या पणजीत 12 संशयित रुग्ण आढळले आहे, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्‍या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना माहात्‍मे यांनी दिली. मडगाव येथे २० संशयित रुग्ण आढळले आहे, तर कांदोळी येथे ३७ संशयित रुग्ण आढळल्याचे डॉ. माहात्मे यांनी स्पष्ट केले.

Dengue in Goa
राहुल गांधी ED केसचे पडसाद गोव्यात; GPCC अध्यक्षांसह कार्यकर्ते ताब्यात

गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. डेंग्यूच्या डासांचा स्रोत रोखण्यासाठी खात्याकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात फवारणी, लार्व्हा विरोधी उपाय, परिसरात पाणी साचणार नाही यासंदर्भात जागृकता यांचा समावेश आहे. दोन दिवस जोरदार पाऊस पडल्याने खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गस्ती वाढवल्या आहेत,असे डॉ. माहात्मे यांनी स्पष्ट केले.

डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यासाठी केवळ ५ एमएल पाण्याची आवश्‍यकता असते, त्यासाठी लहान कपात देखील पाणी साचून डास होऊ शकता. त्‍यामुळे संसर्ग झाल्यास याचा स्रोत सापडणे अवघड आहे. यासाठी लोकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची आवश्‍यकता आहे. कप, नारळीची करवंटी,भांडी, नीळा बॅरलमध्ये पाणी साचून ठेवू नये. तसेच पाण्याच्या टाक्या घट्ट बंद केल्या पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्‍या डॉ. माहात्‍मे यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com