सावधान...वास्‍कोवर डेंग्‍यूचे सावट.

dainik gomantak
सोमवार, 11 मे 2020

पावसाळा सुरू होण्यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण वास्को परिसरात आढळू लागले आहेत. आतापर्यंत एकूण चार रुग्ण डेंग्यूने त्रस्त असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर ‘गोमेकॉ’त आणि मडगाव येथील हॉस्पिसियो या ठिकाणी उपचार सुरू आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मुरगाव, 

पावसाला सुरवात होण्यापूर्वीच वास्को परिसरात डेंग्यूचे रुग्ण सापडू लागल्यने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यात धोक्याची घंटाही नाकारता येत नाही. दोन-तीन दिवसांत डेंग्यूची लागण झालेले रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण वास्को परिसरात आढळू लागले आहेत. आतापर्यंत एकूण चार रुग्ण डेंग्यूने त्रस्त असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर ‘गोमेकॉ’त आणि मडगाव येथील हॉस्पिसियो या ठिकाणी उपचार सुरू आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
वास्को परीसरात विशेषतः गजबजलेल्या वस्तीत साफसफाईच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या मुरगाव पालिकेने मान्सूनपूर्व कामे हाती घेतलेली असली तरी, गटारांतून उपसलेली घाण वाहून नेण्याच्या बाबतीत चालढकल होत असल्याने डासांची पैदास होत आहे. हेच कारण डेंग्यूसारखी समस्या वाढणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विविध भागांत डासांची पैदास
पावसाळा सुरू झालेला नासतानाही मुरगाव पालिका क्षेत्रात डासांची पैदास वाढली आहे. शांतीनगर, नवेवाडे, इस्लामपूर, बायणा, मांगोरहिल, सडा, जेटी, रुमडावाडा, बोगदा, देस्तेरोवाडा, खारवीवाडा, नॉनमॉन, मुंडवेल, मेर्सिसवाडे या परीसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यावर पालिका आणि आरोग्य खात्याने लक्ष वेधले नाही तर परिस्थिती भयानक होण्याची भीती वर्तवली जात आहे. गत आठवड्याभरात डेंग्यूचे चार रुग्ण पालिका क्षेत्रात आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाच्या कचाट्यात दोन लहान मुलेही सापडली आहेत.

नगरसेवक दाजी साळकर यांच्या
निवेदनाकडे मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वास्को शहरातील नगरसेवक दाजी साळकर यांनी डेंग्यूसारखे रोग पालिका क्षेत्रात होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करणारे निवेदन गेल्याच आठवड्यात पालिका मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी सादर केलेले आहे. शहरातील सिग्नेचर प्रकल्प आवारातील भंगारात काढलेली पालिकेची कचरावाहू वाहने ठेवल्याने पावसाळ्यात डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू रोगाची लागण होऊ शकते असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद करून पालिकेचे लक्ष वेधलेले आहे. पण, आतापर्यंत या निवेदनाची दखल घेतलेली नाही.

 

संबंधित बातम्या