Fog In Goa: दाट धुक्याचा फेरीबोट सेवेला फटका, वाहनांच्या लांबच लांब रांगा

फेरी पॉईंटजवळ काहीकाळ वाहतूक कोंडी
Fog In Goa
Fog In GoaDainik Gomantak

Weather in Goa: देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून गोव्यातही थंड हवामान आहे. मागील 3-4 दिवसांपासून गोव्यातील तापमान 20 अंश च्या खाली आले असून सोमवारी सकाळी गोव्यात दाट धुके पसरले होते. या दाट धुक्याचा सामना सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला करावा लागला.

चोडण- रायबंदर येथील फेरीबोट सेवेला धुक्याचा फटका बसला. धुक्यामुळे फेरी सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. वेळेवर फेरी न सुटल्याने फेरी पॉईंटजवळ (धक्क्यावर) काहीकाळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. फेरी प्रमाणेच रस्ते वाहतुकसुद्धा धीम्यागतीने सुरु होती.

Fog In Goa
Goa Temperature: कडाका वाढला! पणजीत सलग तीन दिवस पारा 20C च्या खाली
Weather in Goa
Weather in GoaDainik Gomantak

सोमवारी पहाटे गोव्यातील अनेक भागांमध्ये दाट धुके अनुभवायला मिळाले. या धुक्याचा सामना सकाळी कामावर निघणाऱ्या लोकांना करावा लागला. या बदलत्या वातावरणाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com