राजकारण हे सरदेसाईंसाठी धंदा

राजकारण हे सरदेसाईंसाठी धंदा
Deputy chief minister Babu Ajgaonkar critisizes Goa Forward president Vijay Sardesai

पेडणे :  गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एका कार्यक्रमात आपल्यावर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केली आहे. सरदेसाई आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचे भासवत आहेत. पण, त्याचे संबंध कोणाकोणाशी आहेत ते संपूर्ण गोव्यातील  जनतेला ठाऊक आहे. काचेच्या घरात राहणाऱ्याने  दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात याचे भान सरदेसाई यांनी ठेवावे, असा इशाराही आजगावकर यांनी दिला. 

राजकारण हा सरदेसाई यांचा धंदा झालेला असून धंदेवाईक राजकारणी अशी भूमिका त्यांनी घेतल्याने त्यांना असे आरोप करावे लागत असावेत. सरदेसाई यांनी आता मांद्रे व पेडण्यात नारळ ठेवले आहेत. ते नारळ आहेत की `बोंडे ` ते पुढे मतदार ठरवतील, अशी टिका आजगावकर यांनी केली आहे. सरदेसाई यांच्यासह तिघांना भाजपने सरकारमधून काढून टाकून गोव्याला सेटलमेन्ट घोटाळ्यांच्या संकटातून बाहेर काढले. सरदेसाई आता कुटील बुद्धीने काही मतदारसंघात उमेदवारू उभे करू पाहात आहे. त्यातील कितीजण निवडून येतील ते आगामी निवडणुकीत कळेलच. खुद्द सरदेसाई फातोर्डा मतदारसंघात निवडून येतात की नाही, याबद्दल सांशंकता आहे. फॉर्मेलीन, सेटलमेन्ट व इतर विषयांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. उपमुख्यमंत्री असतानाही फॉर्मेलीन विषयावर निर्णय घेण्यास त्यांना अपयश आले, असेही आजगावकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com