Goa Politics: हे सरकार जनतेचे ,म्हणूनच कायमस्वरूपी नोकरीच्या संधी: बाबू आजगावकर

babu ajgaonkar
babu ajgaonkar

मोरजी: भाजपा सरकार (Bjp Government) हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. भाजपा सरकारने आणि भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी दिलेल्या आश्वासनानंतर क्रीडा (Sports) खात्यातील 274 हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची किमया फक्त भाजपाच करू शकतो ,आता याही पुढे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे हात बळकट करण्यासाठी जनतेने याही पुढे भाजपाला साथ देण्याचे आवाहन क्रीडा मंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे शाशकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या क्रीडा खात्यातील विविध भागातील 274 हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणारे पत्र वितरीत केल्यानंतर बोलत होते. (Deputy Chief Minister Babu Azgaonkar said that the government belongs to the people)

2007 ते 2008 या दरम्यान राज्यातील एकूण 274 हंगामी कर्मचारी म्हणून क्रीडा खात्यात भरती केली होती, त्यानंतर आलेल्या सरकारने त्याना कायमस्वरूपी केले नाही. त्यात पेडणे तालुक्यातील एकूण 75 कर्मचारी होते . ते हंगामी विविध भागात काम करायचे , आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा या कर्मचाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर यायचा . ज्यावेळी 2017 साली भाजपा मगो संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मनोहर पर्रीकर यांनी दिला , त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून  आपण अगोदर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन घेतले होते. आणि भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजारी पडण्यापूर्वी या फाईलवर स्वाक्षरी केली होती , त्याचा पाठपुरावा करून आता सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतल्याचे सांगितले .

यावेळी क्रीडा अधिकारी सदा सावळ देसाई , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, चांदेल सरपंच संतोष मळीक भूषण नाईक, रामा सावळ देसाई आदी उपस्थित होते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com