धोकादायक संरक्षक बेटाची रचना बदलण्याची बोरी उपसरपंचांची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

बोरीचा नवा पुल बांधतेवेळी बोरी तारीभाट जोडरस्ता बांधण्यात आला. हा रस्ता येथील घरे आणि दुकाने वाटवून वक्र बांधला गेला. त्यामुळे जोड रस्त्याचा भाग  उतरणीचा झाला आहे. या उतरणीवर पाच संरक्षक बेटे बांधली गेली आहेत.

बोरी: अपघात प्रवण बोरी सर्कल या पाच संरक्षक बेटावर घडणारे अपघात टाळण्यासाठी या धोकादायक संरक्षक बेटाची रचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राजरस्ते विभागाने त्वरीत बदलावीत अशी मागणी बोरीचे उपसरपंच सुनील सावकर यांनी केली आहे.  त्यासाठी संबंधित खात्याला निवेदन देण्याचे ठरवले आहे.

बोरीचा नवा पुल बांधतेवेळी बोरी तारीभाट जोडरस्ता बांधण्यात आला. हा रस्ता येथील घरे आणि दुकाने वाटवून वक्र बांधला गेला. त्यामुळे जोड रस्त्याचा भाग  उतरणीचा झाला आहे. या उतरणीवर पाच संरक्षक बेटे बांधली गेली आहेत. पैकी शिरोडा, कुडचडे भागातून फोंडा पणजी भागात जाणारा सरळ रस्ता तसेच मधल्या वर्तुळाकार मोठ्या संरक्षक बेटाला वळसा घालून मडगाव वास्कोला जाणारा रस्ता, फोंडा पणजीहून मडगावला जाणारा सरळ चढणीचा रस्ता तर मधल्या संरक्षक बेटाला वळसा घालून जाणारा शिरोडा, सांगे भागात जाणारा रस्ता बोरीपुलावरून फोंडा, बोरी, शिरोडाच्या दिशेने जाणारा मडगाव, कारवार वास्को भागातील वाहनांचा रस्ता या चोहोबाजूच्या रस्त्यामुळे या पाचही संरक्षक बेटावर चक्रव्ह्यू तयार झालेला आहे.  मडगाव वास्को भागातून वाहनाची वर्दळ कायम चालू असते. त्याच्यातच वेर्णा औद्योगिक वसाहतीतून  आणि वास्को बंदरातून अवजड  मालाची ने आण करणारी वाहने बेळगाव, हुबळी, कोल्हापूर आदी भागात इंधन तेल घेऊन जाणारे टॅंकर मडगाव वास्कोहून प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच पणजी फोंडा येथून व विरूध्द बाजूने सांगे, कुडचडे, शिरोडा भागातून येणारी वाहने या संरक्षक बेटाकडे एकत्रित होऊन वाहनाना अपघात घडण्याचे सत्र चालू असते. या पाचही संरक्षक बेटांची रचना चुकीच्या पध्दतीची आहे. तसेच कुठली वाहने कुठच्या बाजूने येतात हे समजत नाहीत. या संरक्षक  बेटाशेजारील मडगावहून फोंड्याच्या दिशेने जाणारा रस्ता उतरंडीचा तसेच वळणाचा असल्याने मालवाहू अवजड वाहने या रस्त्याने वेगाने येतात व या उतरणीवर कलंडून पडतात. पंधरा दिवसापूर्वी माशेल वीजकेंद्रातील वीजेचे खांब घेऊन जाणारा ट्रक कोसळून जी दुर्घटना घडली त्यात तीन कामगार चिरडून मरण पावले. यापूर्वी याच ठिकाणी इंधन घेऊन जाणारे टॅंकर  मालवाहू ट्रक टेंपो पडून अपघात घडले आहेत. तर फोंडाहून मडगावच्या दिशेने जाणारी एक मुंबईहून आलेली बस येथील दगडाच्या खाणीत पडून एक माणूस मरण पावला होता. तर कुडचडेचा एका युवकाला या सर्कलकडे  अघात घडून तो मृत झाला होता.  

या सर्कलवर वाहने कोसळून वाहने सर्कलवर आश्‍चर्यकारक रित्या चढून राहण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. या रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना जाण्यासाठी हा रस्ता धोकादायक होईल तेवढे हे रस्ते सरळ करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यासाठी या पाचही संरक्षक बेटावर सिग्नलची यंत्रणा बसवल्यास येथून जाणारी वाहने योग्य दिशेने सुरळीतपणे जाऊ शकतात. तसेच सर्कलच्या रस्त्यावर परराज्यातून येणारी मालवाहू वाहने तसेच टॅंकर उभे करून ठेवले जातात. त्यामुळे रस्ता अडवला जातो. व दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनाना बाजू देता न आल्याने अपघात घडतात. फोंडावाहतूक पोलिसांनी आणि वाहतूक खात्याच्यानिरीक्षकानी यावर कारवाई करण्याचे सत्र अवलंबवायला हवे. या रस्त्यावर वारंवार घडणारे हे जीवघेणे अपघात आणइ होणारी वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित खात्याने उपाययोजना करावी अशी ही उपसरपंच सुनील सावकर यांनी मागणी केली आहे.शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हमरस्ते विभागाच्या अभियंत्याना बोलावून या धोकादायक संरक्षक बेटासंबंधी विचार करण्यासाठी या संरक्षक बेटाला अभियंत्यासह भेट देऊन पाहणी करून उपाययोजना करणार आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या