आझाद मैदानावर स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबासह धरणे आंदोलन सुरू

descendants of the freedom fighters protest for the demand to provide a Government job
descendants of the freedom fighters protest for the demand to provide a Government job

पणजी :  स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन तीन वर्षे उलटून गेले तरी सरकारने पाळले नाही त्यामुळे दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून (४ जानेवारी) आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले.

हे आंदोलन सरकार या पाल्यांना सेवेत घेण्यात येईपर्यंत सुरूच राहणार आहे, असा इशारा स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी दिला. आजपासून सुरू झालेले हे धरणे आंदोलन सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत १७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १८ ते २१ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तर २२ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक व त्यांची पाल्ये सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com