पर्येत सासरे, सून आमने-सामने, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊनही...

सीनियर राणे अखेर दिव्या राणे यांच्या विरोधात
Pratap singh Rane
Pratap singh Rane Dainik Gomantak

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे तेजीत वाहत असून, अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघात काँग्रेसने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रथम निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यांनी राजकारणात सक्रीय असल्याचे पुन्हा एकदा दाखवत आपली सून दिव्या राणे यांच्या विरोधात लढण्याचे निश्चित केले आहे.

Pratap singh Rane
संकल्प आमोणकरांनी भरला 'या' मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

भाजपने (BJP) आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. पर्ये हा मतदारसंघ प्रतापसिंह राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघाच्या निर्मितीपासून प्रतापसिंह राणे विजयी होत आले आहेत. आता पुन्हा एकदा या मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर करत प्रत्यक्ष प्रचाराला सुरवात केली आहे. पर्ये येथील भूमिका देवी मंदिरात त्यांनी नारळ ठेवून काँग्रेसचा उमेदवार विजय व्हावा, असे सांगणे केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी विजयादेवी राणे, रणजित राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतापसिंह राणे यांच्या या निर्णयामुळे भाजपसमोर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासमोर नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार कायम ठेवल्यास या मतदारसंघांमधून प्रतापसिंह राणे विरुद्ध डॉ. दिव्या राणे अशी सासरे विरोधात सून अशी लढत होण्याची शक्यता आहे. यातच या मतदारसंघांमधून आम आदमी पक्षाने विश्वजित कृष्णराव राणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. हे राणेही त्या राणे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. सीनियर राणे विरुद्ध दिव्या, राणे विरुद्ध विश्‍वजित राणे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

Pratap singh Rane
मांन्द्रे मतदारसंघात वाढली MGP ची ताकद, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जीत आरोलकरांना पाठिंबा

कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊनही राणे लढणारच!

प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक (Election) लढवू नये, यासाठी भाजपकडूनही शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. गोवा सरकारने मागील महिन्यात प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देत राजकारणातून निवृत्त होण्यास वाट मोकळी करून दिली होती. इतकेच नाही, तर विश्वजित राणे यांनी प्रतापसिंग राणे यांना सन्मानाने निवृत्त व्हावे असा सल्लाही दिला होता. मात्र, अजूनही प्रतापसिंग राणे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत.

दुसरा उमेदवार द्यावा

पी. चिदंबरम यांनी रविवारी प्रतापसिंह राणे यांनी आपली उमेदवारी पर्ये मतदारसंघातून निश्चित करावी किंवा त्यांनीच काँग्रेसला (Congress) उमेदवार द्यावा असे आवाहन केले होते. लागलीच प्रतापसिंग राणे यांनी आपला प्रचार सुरू केला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यास पर्ये मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा राजकीय सामना प्रथमच रंगणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com