चीनकडून अतिक्रमण होऊनही होतेय दिशाभूल 

girish
girish

पणजी

चीनने फौजांनी भारताच्या भूप्रदेशावर अतिक्रमण करून कब्जा मिळवलेला नाही असा दावा करून केंद्रातील भाजप सरकार देशाची दिशाभूल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवान शहिद होऊनही काहीच स्पष्टीकरण केले नाही. उलट चीनचा डाव यशस्वी करण्यास हातभार लावत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केला. 
गल्वान खोरे, पॅंगोग टीएसओ तळे क्षेत्र, गरम पाण्याचे झरे आणि व्हाय जंक्शनपर्यंत देस्पांग सखल भूक्षेत्र काबीज केले असल्याचा चिनी फौजा करत आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भारतीय प्रदेशावर चीनने अतिक्रमण केलेलेच नाही किंवा चिनी फौजांनी भूप्रदेशावर कब्जा मिळवलेला नाही असे फेसबुक लाईव्हद्वारे माध्यमांशी बोलताना केला आहे. हा राष्ट्रावर केलेला घोर अन्याय, मोठे दुष्कृत्य आहे. प्रत्येक वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणच्या चिनी अतिक्रमणाबद्दल प्रश्न विचारताच मोदी सरकार मात्र फसवी उत्तरे देऊन देशवासियांचे चित्त विचलित करण्याचे प्रयत्न करीत असल्याची खंत चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. 
राष्ट्र हितासाठी काँग्रेस पक्ष तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. पंतप्रधानाना चीनबद्दल विशेष आस्था आहे हे त्यांच्या चीनबद्दल घेतलेल्या सौम्य भूमिकेवरून दिसून येत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी चीनचे चारवेळा केलेले दौरे चीनशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे संकेत देतात. पाचवेळा चीन दौऱ्यावर जाणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत असे चोडणकर म्हणाले.  
सगळ्यात चिंताजनक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादाक अशी गोष्ट म्हणजे अलीकडे पंतप्रधानांच्या पीएम केअर्स (खासगी मानल्या जाणाऱ्या) निधीसाठी चिनी कंपन्यांनी दिलेल्या देणग्या या पीएम केअर्स निधीची घटनात्मक रचना काय आहे, निधी कोठे, कसा खर्च केला जाणार, त्यावर कोणाचे नियंत्रण आहे हे स्पष्ट नाही. हा निधी सार्वजनिक अधिकक्षेत येत नसल्याचे पंतप्रधानाच्या कार्यालयाने जाहीर केले आहे. महालेखापाल, हिशेब तपासनिस पीएम केअर्सला लागणार नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास हा निधी पंतप्रधान आपल्या मर्जीनुसार गुप्तपणे वापरणार असून पारदर्शकता, हिशेबी तत्वांना तेथे थारा नसल्याचे दिसत नाही. केंद्रातील सरकारने चिनी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी घेतल्या आहेत मात्र त्याचा वापर कुठे केला याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे हा निधी पीएम
केअर्सकडे वळवण्यात आली आहे का व ती किती आहे याची उत्तरे त्यांनी द्यावीत असे असे ते म्हणाले. 
भारतीय भूक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्या चीनमधील कंपन्यांकडून देणगीच्या स्वरुपात पंतप्रधान निधी स्वीकारत राहिले व चिनी फौजांचे आक्रमण झाल्यास ते देशाला संरक्षण कसे देऊ शकणार? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदी यांच्याकडून राष्ट्राला अपेक्षित असून ते द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.  

देशातील पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या (२९ जून) म्हापसा व मडगाव येथे गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे धरणे कार्यक्रम आयोजित केला आहे. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना देण्यासाठी संबंधित तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. कोविड - १९ चे संकट सुरू असताना या दरवाढीने सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com