Bicholim News: ग्रामीण भागाचा विकास साधणार- आमदार चंद्रकांत शेट्ये

मुळगाव, मेणकुरे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak

Bicholim News: डिचोलीतील ग्रामीण भागात विविध प्रकल्प उभारुन मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार, अशी ग्वाही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. मुळगावसह मेणकुरे आदी भागात विविध विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

जलस्रोत खात्यातर्फे सुमारे 10 लाख रुपये खर्चून तांबडा रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.112 मीटर बांधण्यात येणाऱ्या या भिंतीची लांबी दीड मीटर आहे. मुळगाव पंचायतीच्या जीआयए निधीतून 4.35 लाख खर्चून शिरोडवाडी येथील स्मशानभूमीचा डागडुजी करण्यात येणार आहे.

मेणकुरेत तळीची दुरुस्‍ती-

जलस्रोत खात्यातर्फे सुमारे 46 लाख रुपये खर्चून मेणकुरे येथील श्री महादेव देवाच्या तळीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तळ्यासभोवती आणि गावातील नाल्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

या कामाची पायाभरणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते झाली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवाडकर, मेणकुरे सरपंच गुरूदास परब, उपसरपंच कुमुदिनी नाईक व मान्‍यवर उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com