Rohan Khaunte: दोन्ही विमानतळांमुळे पर्यटन क्षेत्राचा विकास

पर्यटनमंत्री रोहन खंवटे ः विविध विकास योजनासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Rohan Khaunte मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दाबोळी विमानतळ हे दोन्ही विमानतळ पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या दोन्ही विमानतळावरून येणारे पर्यटक इंटरनॅशनल पर्यटक व देशी पर्यटक यांना नजरेसमोर ठेवून पूर्ण उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पेडणेतील बैठकीला पर्यटन खात्याचे अधिकारी, आमदार जीत आरोलकर उपस्थित होते. यावेळी पर्यटनासंदर्भातील मांद्रे, पेडणेतील प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली.

Rohan Khaunte
Siolim News: फाईव्ह पिलार चर्चस्थळी धर्मांतर नाहीच; न्यायालयाकडून 'तो' आदेश रद्दबातल

पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, देशभरातून आणि विदेशातून अनेक पर्यटक किनारी भागाला भेट देतात. या पर्यटकांसाठी किनाऱ्यावर त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी, लॉकरची सोय, कपडे बदलण्यासाठी खोली, पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

मंत्री खंवटे पुढे म्हणाले, आमदार आरोलकर यांनी आपल्याला वेळोवेळी येथील समस्या, विकासाबाबत माहिती दिली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Rohan Khaunte
Goa Congress: भाजपच्या ‘मिशन टोटल कमिशन’ विरुद्ध काँग्रेसची मोहीम

मोपा विमानतळ आणि दाबोळी विमानतळ या दोन्ही प्रकल्पामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचा विकास महत्त्वाचा असल्याने तशा पद्धतीने सरकारने पावले उचललेली आहेत.

आमदार आरोलकर म्हणाले, विकासाला गती देण्यात येत असून मांद्रे मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या चौफेर विकास केला जाईल. केंद्र सरकारच्या पर्यटन निधीतूनही विकासाची कामे आखण्यात आलेली आहे. ती लवकर पूर्ण करण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com